![]()
पोलिसांनी सियाकडून दोन आणि चेतनकडून एक मोबाइल जप्त केला आहे. या मोबाइलमध्ये पोलिसांना मोठ्या प्रमाणावर डेटा मिळाला असून त्यात त्यांच्या गुप्त लग्नाचे चॅटिंगही सापडले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तथापि, त्यांच्या लग्नाचे अद्याप कोणतेही कायदेशीर पुरावे मिळाले नसले तरी या चॅटिंगची सखोल खातरजमा केली जात आहे. या जप्त केलेल्या मोबाइलच्या डेटा विश्लेषणाला थोडा वेळ लागेल. मोबाइल डेटातून कटाची आणखी धक्कादायक गुपिते उलगडण्यास सुरुवात झाली. कुटुंबाच्या दबावामुळे केतनशी साखरपुडा करणाऱ्या सिया गोयलने प्रियकर चेतन चौधरी याच्याशी चार महिन्यांपूर्वीच गुपचूप लग्न केल्याचा पोलिसांना संशय आहे. केतनची हत्या करून ‘अपघात’ भासवण्यासाठी त्यांनी विविध हत्याकांडांचा सखोल अभ्यास केला होता. थंड डोक्याने हत्या करून पचवायची तयारी होती एखाद्या निर्दयी गुन्हेगाराप्रमाणे त्यांनी हत्या करून ती पचवायची कशी, याचे पर्याय शोधले. गुन्हा केल्यानंतर पोलिस कारवाईपासून कसे वाचायचे, यासाठी त्यांनी इंटरनेटचा वापर केला. कटाचा भाग म्हणून मे महिन्यात सिया केतनसोबत लोहगडावर गेली होती.तेथे केतनला दरीत ढकलून अपघाताचा बनाव रचण्याचा तिचा डाव होता. चेतन व तिने मिळून अत्यंत थंड डोक्याने हे भयानक षड्यंत्र रचले होते.
Source link
केतन अग्रवाल हत्याकांड:सिया-चेतनच्या गुपचूप लग्नाबाबत केलेल्या चॅटिंगचा तपास; डेटातून गुपिते उलगडणार, चार महिन्यांपूर्वी विवाह केल्याची माहिती, पोलिस खातरजमा करतायत