![]()
अकलूज व पंचक्रोशीतील गावांना दर १५ दिवसांनी पाणी मिळणार असे प्रशासनाने जाहीर केल्यानंतर तहानलेल्या नागरिकांना पाणी पुरवण्यासाठी अकलूजच्या सहकार महर्षि साखर कारखान्याने अकलूज, शंकरनगर, संग्रामनगर आणि परिसरातील वाड्यांवर रोज दोन लाख लिटर आरओ पाणी पुरवण
.
कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या या जनसेवेच्या संदर्भात अकलूज नगर परिषदेचे नगरसेवक सयाजीराजे मोहिते-पाटील व मित्रमंडळ परिवार, अकलूज यांनी जनतेची सेवा हेच कर्तव्य मानून पाणी वाहतूक तसेच वितरण करण्यासाठी स्वयंसेवक म्हणून मोठा सहभाग नोंदविला असल्याचे आवर्जून सांगितले.
कारखाना कार्यक्षेत्रामधील मौजे अकलूज, माळेवाडी, संग्रामनगर व शंकरनगर या गावातील नागरिकांना पाण्याचा पुरवठा होत असलेल्या मौजे विझोरी येथील तलावात पाणीसाठा उपलब्ध नाही. तसेच पाटबंधारे विभागाकडून इरिगेशनचे येणारे पाणी वेळेत न मिळाल्याने पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर झालेला आहे. सदर भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्याकरिता सामाजिक बांधिलकीचा एक भाग म्हणून कारखान्यामार्फत मोफत आर.ओ. प्रक्रिया केलेल्या शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा टँकरद्वारे सुरू केला आहे. पावसाची अनिश्चितता व पाटबंधारे विभागाकडून पाणी उपलब्धता याचा विचार करता सर्व नागरिकांनी टँकरद्वारे मिळणारे पाणी शिस्तीने घेऊन काटकसरीने वापरावे, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते- पाटील यांनी केले.