![]()
विशेष पुनरीक्षण मोहिमेत मतदार नोंदणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षक बीएलओंना (मतदान केंद्रस्तरीय अधिकारी) विशेष मतदार पुनरीक्षण कार्यक्रमाच्या (एसआयआर) कामासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याची तक्रार होती. याची दखल घेत शिक्षक बीएलओंना आता शाळा आणि महावि
.
तीन तास शिकवल्यानंतर शिक्षकांना शाळेचे कोणतेही अतिरिक्त काम देऊ नये, असे आदेश मध्य विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी डॉ. व्यंकट राठोड यांनी गुरुवारी काढले. यामुळे संबंधित शिक्षकांच्या शाळेच्या वेळेत बदल होणार आहेत.निवडणूक आयोगातर्फे ३० जून ते ७ ऑक्टोबरमध्ये एसआयआर राबवला जात आहे.
आदेशाची कठोरपणे अंमलबजावणी करणार
या आदेशाची प्रशासनाकडून कठोर अंमलबजावणी केली जाणार आहे. कोणत्याही आस्थापना, कार्यालय, मुख्याध्यापक, प्राचार्य किंवा केंद्रप्रमुखांनी या आदेशाचे उल्लंघन करून बीएलओंना तीन तासांनंतर किंवा शनिवार, रविवारसह सुटीच्या दिवशी अतिरिक्त काम दिले, तर त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करण्यात येतील. निलंबनही केले जाईल.