Headlines

मुसळधार पावसाला ब्रेक!:पुढील 10 दिवस महाराष्ट्रात तुरळक सरी; मात्र 'या' भागांसाठी अजूनही सतर्कतेचा इशारा




गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात धुमाकूळ घालणाऱ्या पावसाचा जोर आता हळूहळू कमी होण्याची चिन्हे आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती, दरडी कोसळणे आणि नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र हवामान विभाग आणि तज्ज्ञांच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस राज्यात बहुतांश भागात पावसाची तीव्रता कमी राहणार असली, तरी काही भागांमध्ये अधूनमधून जोरदार सरींची शक्यता कायम आहे. पुढील दहा दिवसांचा पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यातील बहुतांश भागात पुढील दहा दिवस मुसळधार पावसाऐवजी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई आणि कोकणात मध्यम स्वरूपाच्या सरी कायम राहतील, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात मात्र पावसाचे प्रमाण तुलनेने कमी राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तरीही घाटमाथा आणि डोंगराळ भागांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचा जोर का कमी होतोय? हवामान तज्ज्ञांच्या मते, फिलिपाइन्सजवळ तयार झालेल्या ‘बावी’ या सुपर टायफूनचा मान्सूनच्या हालचालींवर परिणाम होत आहे. या प्रणालीमुळे बंगालच्या उपसागरात नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्यास विलंब होत असून, त्यामुळे मान्सूनची सक्रियता काही दिवसांसाठी मंदावली आहे. ही परिस्थिती बदलल्यानंतर पुन्हा एकदा राज्यात पावसाचा जोर वाढू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पूरस्थितीत दिलासा, पण सावधगिरी आवश्यक गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक धरणांतील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून काही नद्यांनी धोक्याची पातळीही ओलांडली होती. आता पावसाचा जोर कमी झाल्याने अनेक भागातील पूरस्थिती हळूहळू निवळत आहे. मात्र नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी आणि डोंगराळ भागातील रहिवाशांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, तसेच हवामानातील बदल लक्षात घेऊन सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. हेही वाचा.. डिजिटल अटक करून 10 कोटींची फसवणूक, 95 लाख कमिशन:एजंटने बनावट पोलीस बनून घाबरवण्याचा मार्ग सांगितला, स्कॅम कंपाऊंडमध्ये पोहोचला रिपोर्टर …भाग-2 ‘अमेरिकेत जे भारतीय आहेत, त्यांच्याकडे खूप पैसा आहे. पाकिस्तानी मुलाने एका महिन्यात 95 लाख रुपयांपेक्षा जास्त कमिशन मिळवले. त्याने भारतीय ग्राहकाला डिजिटल अटक करून 9.5 कोटी रुपयांचे पेमेंट करून घेतले होते.’ सायबर स्कॅम करणाऱ्या उद्योगात मुलांची भरती करणाऱ्या एजंट विकीला आम्ही कंबोडियामध्ये भेटलो. सायबर स्कॅमद्वारे भारतात दररोज सुमारे 61 कोटी रुपये आणि दरमहा 2 हजार कोटी रुपये लुटले जात आहेत. कंबोडिया-मलेशियासारखे देश याचे केंद्र बनले आहेत. कंबोडियामध्ये एखाद्या उद्योगाप्रमाणे सायबर स्कॅम कंपन्या सुरू आहेत, त्यामुळे आम्ही चौकशी करण्यासाठी तिथे पोहोचलो. सविस्तर वाचा..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *