Headlines

रस्त्यांवरील कळपांमुळे अपघातात मोठी वाढ:मोर्शीत मोकाट जनावरांनी घातला हैदोस : नागरिकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता‎




शहराच्या मुख्य रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांच्या कळपांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. काही वर्षांपूर्वी येथे मोठा अपघातसुद्धा घडला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला, मध्यभागी, जनावरांचे कळप बसून राहत असल्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. शहरातील बसस्थानक परिसर, सिंभोरा चौक, जयस्तंभ चौक, जुने बसस्थानक, महामार्ग, मुख्य भाजी बाजार, अशा मध्यवर्ती भागांत जणू काही जनावरांचेच साम्राज्य आहे. त्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील अमरावती ते वरुड या रस्त्यावर कायम मोकाट जनावरे दिसतात. या रस्त्यावर उपजिल्हा रुग्णालयासह अनेक शाळा व महाविद्यालये आहेत. नगरपरिषदेने अशा गुरांना पकडून गो-शाळेमध्ये जमा करावे. त्या गुरांच्या मालकांकडून मोठ्या रकमेचा दंड वसूल करावा, अशी मागणी पुढे आली आहे. या रस्त्यावर मोकाट जनावरे फिरत असल्यामुळे अनेकदा वाहनचालकांना अचानक ब्रेक मारावा लागतो. त्यातून अपघात होण्याचा धोकाही वाढला आहे.मोठा अपघातसुद्धा घडला होता. ^मोर्शी शहरात लाऊड स्पीकरद्वारे मुनादी सुरू करण्यात आली आहे. मोकाट जनावरे सोडणाऱ्या मालकांना तशा प्रकारच्या सूचना देण्यात येत आहेत. तरीसुद्धा रस्त्यावर मोकाट जनावरे दिसल्यास नगरपरिषदेच्या वतीने टेंडर काढले जाईल. मोकाट जनावरे पकडली जातील. जनावरांच्या मालकांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. – प्रतीक्षा गुल्हाने, नगराध्यक्ष, मोर्शी. खराब झालेली भाजी, पथदिवेही बंद गांधी मार्केटसमोर भाजीबाजार भरतो. भाजी विक्रेत्यांनी खराब झालेली भाजी फेकून दिल्यानंतर ती खाण्यासाठी येथे जनावरांचा कळप उभा असतो. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. नागरिकांनाही त्रास होत आहे. अमरावती-वरुड रस्त्यावरील पथदिवे अनेकवेळा बंद राहतात. रात्री मोकाट गुरे रस्त्याच्या मधोमध बसतात. वाहनचालकांना ती दिसत नाहीत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *