![]()
सोशल मीडिया लाईव्हचा “डिजिटल ट्रॅप’ रचून घोडेगाव उपआवाारात केवळ ४ गोण्यांना ४,२०० रुपयांचा सोन्याचा भाव दाखवून खोटी हवा करण्यात आली. हे आमिष पाहून शेतकऱ्यांनी आवक वाढवताच, त्यांचा शेकडो क्विंटल कांदा पडत्या भावात लुटल्याचा पर्दाफाश झाला आहे. लिलावात
.
बाजार समित्यांमधील लिलावाचे व्हिडिओ सोशल मीडियावर तातडीने लाईव्ह केले जातात. घोडेगावच्या या ४,२०० रुपयांच्या दराचा व्हिडिओही वाऱ्यासारखा पसरला. वास्तविक, सोशल मीडियावरील या लाईव्ह प्रसारणामुळे बाजारात पारदर्शकता येणे अपेक्षीत असते; जेणेकरून घरात बसलेल्या शेतकऱ्याला आपल्या मालाचा भाव समजावे. परंतु, घोडेगावातील व्हिडिओमुळे इतर बाजार समित्यांमधील लिलावावर विपरीत परिणाम झाला. घोडेगाव मार्केटमधील या लिलावाचे जे व्हिडिओ समोर आले आहेत, त्यात मुख्य खरेदीदार दिसत नसून, चक्क एक आडतदार दुसऱ्या आडतदाराच्या लिलावात बोली लावताना दिसत आहे. काही आडते स्वतःच खरेदीदार बनून रिंग करत आहेत. चार-दोन गोण्यांच्या लहान वक्कलला जाणीवपूर्वक अवाजवी जास्त भाव द्यायचा आणि त्या बहाण्याने बाजारात ‘घोडेगावात मोठा भाव मिळतोय’ अशी हवा तयार करायची, ही युक्ती येथे वापरली गेल्याचे उघड होत आहे.
अशी झाली कांदा उत्पादकांची लूट सोमवारी इतरत्र उच्च प्रतीच्या कांद्याला ३ हजार ३२०० रुपयांचे भाव होते. त्यामुळे इतर ठिकाणच्या शेतकऱ्यांना आपल्याकडील बाजार समित्या आपल्याला लुटत आहेत की काय, असा संभ्रम पडला. जास्त भावाच्या आमिषाने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात माल बाजारात आणला. त्यामुळे आवक वाढल्याने हजारो क्विंटल माल अगदी पडत्या भावात खरेदी केला गेला. या संशयास्पद प्रकारानंतर बाजार समिती प्रशासनाने तातडीने पावले उचलत संबंधित ३ आडतदारांची दुकाने काही काळासाठी बंद केली. मात्र, नंतर पुन्हा सुरू करण्यात आली.
आडतदारांवर कायदेशीर कारवाई होईल ^ घोडेगाव उपआवारातील लिलावाच्या दराबाबत आणि पद्धतीबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आम्ही तात्काळ तीन आडतदारांकडून लेखी खुलासा आणि चौकशी अहवाल मागवला आहे. त्यांनी हा भाव कसा दिला, तो कांदा पुढे कोणाला आणि किती दराने विकला, तसेच त्यात त्यांना किती नफा झाला, याची संपूर्ण माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. हा अहवाल आल्यानंतर सविस्तर चौकशी केली जाईल. जर फसवणूक सिद्ध झाली, तर संबंधित आडतदारांवर कडक कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाई होईल.- देवदत्त पालवे, सचिव, नेवासा कृषी उत्पन्न बाजार समिती.
घोडेगाव मार्केटमध्ये आडतदारांची रिंग युक्ती