![]()
“पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या कोणत्याही नागरिकावर प्रशासन अन्याय होऊ देणार नाही. बाधित निवासी मालमत्ताधारक, व्यापारी मालमत्ताधारक आणि व्यावसायिक भाडेकरु असा तिहेरी लाभ देण्यात येणार आहे. नागरिकांच्या सर्व शंकांचे निरसन करून आणि त्यांचे
.
पंढरपूर नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नगराध्यक्षा डॉ. प्रणिता भालके, मुख्याधिकारी महेश रोकडे आणि सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत गुरुवारी पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी देशमुख बोलत होते.
यावेळी उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे, नगरसेवक अमोल डोके, नगरसेविका अनिता ढवळे, प्रणिता घाडगे, संजय बंदपट्टे, सुधीर धोत्रे यांच्यासह नगरपालिकेचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत नगरसेवक राहुल शिंदे-नाईक, ओंकार जोशी, भागवत बडवे, लक्ष्मण शिरसट, सुनील वाळूजकर आणि किरण घाडगे यांनी बाधितांच्या बाजूने अनेक प्रश्न आणि शंका उपस्थित केल्या.
देशमुख पुढे म्हणाले की, यातील बाधितांना शासनाच्या नियमानुसार सर्व लाभ मिळवून दिले जातील. नागरिकांचे समाधान झाल्याशिवाय हा प्रकल्प पुढे नेला जाणार नाही. यापुढे ही चर्चा होईल, सगळ्या सूचनांची नोंद घेतलेली आहे. सगळ्या प्रश्नांवर विचार केला जाईल. संपूर्ण बाधितांची यादी जाहीर करू, कोणतीही गोष्ट लपवून करायची नाही.
सुरुवातीला देशमुख यांनी पंढरपूर नगरपालिकेच्या सर्व नगरसेवकांसमोर प्रस्तावित कॉरिडॉर आणि पंढरपूर शहराच्या विकासाचा आराखडा सादर केला. नगरसेवक, नगराध्यक्ष यांच्या सूचना ऐकून घेतल्या. बहुतांश नगरसेवकांनी स्थानिक नागरिक, नगराध्यक्ष आणि लोकप्रतिनिधी यांना विश्वासात न घेता कॉरिडॉर केल्याची तक्रार केली. तसेच कॉरिडॉर, तरतुदी, विकास कामे, नुकसान भरपाई आणि भूसंपादन आदी स्वरूपाच्या स्थानिक पातळीवरील विविध समस्या सांगितल्या.
पंढरपूर कॉरिडॉर हा राज्य शासनाचा महत्वकांशी प्रकल्प आहे. पंढरपूरच्या नागरिकांना विश्वासात घेऊन शासन व प्रशासनाने आराखडा तयार करताना पावले न उचलल्याने त्याचा फटका पालिका निवडणुकीत सत्ताधारी भाजपला बसला. नागरिकांनी विरोधी आघाडीला नेतृत्व दिले. स्थानिक नेत्यांचा विरोध मावळल्या शिवाय प्रकल्प पुढे रेटता येणार नसल्याने प्रथमच पालिकेत नगरसेवकांसमोर पंढरपूर कॉरिडॉर आराखडा सादर करण्याचे धारिष्ट्य दाखवत उदरमतवादी भूमिका घेतली. हे प्रशासनाला उशीरा का असेना सूचलेले शहाणपण आहे.