![]()
वरणगाव पालिकेची गुरुवारी सर्वसाधारण सभा झाली. त्यात भाजप, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नगरसेवकांनी प्रत्येक वॉर्डाला विकासकामांसाठी समान निधी उपलब्ध करून द्यावा, या मागणीसाठी सभागृहात ठिय्या आंदोलन केले. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांनी समान निधी वाटपाबाबत सकारात्मक भूमिका घेतली. योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. गुरुवारी (दि. ९) सकाळी ११ वाजता पालिकेच्या सभागृहात सर्वसाधारण सभेला प्रारंभ झाला. सुरुवातीला विविध वॉर्डांतील विकासकामांसाठी निधी वाटपाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. विरोधी सदस्यांनी सर्व वॉर्डांना समान न्याय मिळाला पाहिजे, अशी भूमिका मांडली. निधी वाटपात भेदभाव नको, यावर जोर दिला. { सभेत शहरातून वाहणाऱ्या भोगावती नदीचे प्रदूषण रोखणे, त्यासाठी शहरातील सांडपाणी नदीत जाणे थांबवण्यासाठी नदीच्या दोन्ही बाजूंनी ड्रेनेज पाइपलाइन टाकणे, नदीचे पुनर्जीवन, सुशोभीकरण आणि खडखडीजवळ बंधारा उभारणे. { शहरातील उर्वरित भागात सपोर्ट पाइपलाइन टाकणे, महात्मा गांधी हायस्कूलजवळील नाल्याचे सुशोभीकरण तसेच अक्सानगरकडे जाणाऱ्या रस्त्यालगत बीओटी तत्त्वावर किंवा शासकीय निधीतून शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्याबाबत चर्चा झाली. त्यासाठी प्रस्ताव देण्यात येणार आहे. { शहरातील अतिक्रमणे तातडीने हटवणे, चुकीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी. मुख्याधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवून नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. आंदोलनादरम्यान नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांनी आंदोलक सदस्यांशी चर्चा केली. नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्षा अरुणा इंगळे, मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवक उपस्थित होते. सभेत ११ विषयांवर चर्चा नातेवाइकांचा हस्तक्षेप मुख्याधिकाऱ्यांनी महत्त्वाची सूचना देताना नगरपरिषदेच्या प्रशासकीय कामकाजात कोणत्याही नगरसेवक किंवा नगरसेविकांच्या नातेवाईकांनी हस्तक्षेप करू नये, असे स्पष्ट केले. अशा प्रकारचा हस्तक्षेप आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला.
Source link
प्रत्येक वॉर्डाला समान निधी द्या; वरणगाव पालिका सभेत ठिय्या:सकारात्मक आश्वासनानंतर माघार, एकूण 11 विषयांवर चर्चा