Headlines

मालेगाव SIR वरून किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप:'बांगलादेशींना हिंदू ठरविण्याचा अड्डा', 1.26 लाखांहून अधिक संशयास्पद मतदारांचा दावा




भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेवरून मालेगावातील मतदार पडताळणी प्रक्रियेबाबत गंभीर आरोप केले आहेत. मालेगाव हे “बांगलादेशींना हिंदुस्थानी आणि हिंदू ठरविण्याचा अड्डा बनत आहे,” असा आरोप करत त्यांनी मोठ्या प्रमाणावर संशयास्पद मतदार आढळल्याचा दावा केला. सोमय्या म्हणाले की, अहिल्यानगर महापालिकेत जुन्या नोंदींमध्ये बदल करून सुमारे 15 हजार बेकायदेशीर जन्म प्रमाणपत्रे दिल्याचे समोर आले आहे. तसेच 2025 आणि 2026 या 16 महिन्यांच्या कालावधीत तब्बल 18 हजार 700 जुन्या जन्मदाखल्यांमध्ये दुरुस्त्या करण्यात आल्याचेही निदर्शनास आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकार, महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने घेतला असून, महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी लवकरच तपास यंत्रणा निश्चित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी महाडमध्ये मुख्याधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या घटनेवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “कोणत्याही डॉक्टर किंवा अधिकाऱ्यावर हात उचलला जाऊ नये. सर्वोच्च न्यायालयानेही याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. नगरसेवक दोषी आढळल्यास त्यांच्याविरोधातील कारवाई अधिक कठोर असली पाहिजे,” असे सोमय्या म्हणाले. मालेगावमध्ये 1.26 लाखांहून अधिक संशयास्पद मतदारांचा दावा एसआयआर मोहिमेदरम्यान मालेगावातील पडताळणीबाबत बोलताना सोमय्या म्हणाले की, पावसामुळे महाराष्ट्रातील पडताळणीच्या कामाचा वेग काहीसा मंदावला असून, निवडणूक आयोगाकडे मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यांनी दावा केला की, मालेगावमध्ये एका बीएलओने दबावाखाली 75 टक्के मतदारांची पडताळणी पूर्ण झाल्याचा अहवाल दिला होता. मात्र, निवडणूक आयोगाच्या सॉफ्टवेअर तपासणीत मोठ्या प्रमाणावर विसंगती आढळल्या. आतापर्यंत तपासलेल्या 2 लाख 41 हजार 450 मतदारांपैकी तब्बल 1 लाख 26 हजार 421 मतदारांमध्ये ‘अॅनॉमली’ (संशयास्पद नोंदी) आढळल्याचा दावा त्यांनी केला. या सर्व मतदारांची पुन्हा पडताळणी केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याच पार्श्वभूमीवर सोमय्या यांनी “मालेगाव हे एसआयआरसाठी बांगलादेशींना मतदार म्हणून, म्हणजेच हिंदुस्थानी बनविण्याचा अड्डा ठरत आहे,” असा गंभीर आरोप केला. एसआयआर म्हणजे काय? भारतीय निवडणूक आयोगाने देशातील 16 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात ही मोहीम 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत राबवली जात असून, सुमारे 9 कोटी 86 लाख मतदारांची घरोघरी जाऊन पडताळणी केली जाणार आहे. यासाठी 97,924 बीएलओ आणि 96,949 बीएलए कार्यरत आहेत. या मोहिमेनंतर 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी, तर 7 ऑक्टोबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. आयोगाच्या म्हणण्यानुसार, या प्रक्रियेचा उद्देश मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करणे हा आहे. दरम्यान, किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांमुळे मालेगावातील मतदार पडताळणी प्रक्रिया आणि जन्मदाखल्यांमधील कथित गैरव्यवहाराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून, चौकशीच्या निष्कर्षाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *