Headlines

Only 92% of the rainfall will occur between June and September, the sun will be hotter, and there will be less rainfall.


  • Marathi News
  • National
  • Only 92% Of The Rainfall Will Occur Between June And September, The Sun Will Be Hotter, And There Will Be Less Rainfall.

अनिरुद्ध शर्मा/अनुप दुबोलिया | नवी दिल्ली1 तासापूर्वी

  • कॉपी लिंक

यंदा मान्सूनच्या काळात देशात सरासरीपेक्षा कमी पावसाची दाट शक्यता आहे. हवामानशास्त्र विभागाने सोमवारी आपला पहिला अधिकृत अंदाज जाहीर केला. त्यानुसार नैऋत्य मान्सून हंगामात देशभरात ९२ टक्के पाऊस पडू शकतो. मान्सूनमध्ये देशात साधारणतः ८७ सेमी पाऊस पडतो, मात्र यंदा ८० सेमी पावसाचा अंदाज आहे.

आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांच्या मते, या अंदाजात ५ टक्के तफावत असू शकते. ‘अल निनो’च्या प्रभावामुळे जूनच्या आसपास वारे उष्ण राहतील व पाऊस कमी पडेल. मात्र, मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात ‘इंडियन ओशन डायपोल’ स्थिती निर्माण होऊ शकते, ज्यामुळे पाऊस वाढेल आणि एल निनोचा प्रभाव कमी होईल. गेल्या ३८ वर्षांत आयएमडीचे अंदाज २० वेळा अचूक ठरले आहेत.

५ वर्षांपासून अंदाज जवळपास अचूक ठरतोय

वर्ष अंदाज प्रत्यक्ष पाऊस स्थिती 2021 101% 99% जवळपास अचूक 2022 99% 106% अधिक 2023 96% 94% थोडेसे कमी 2024 106% 108% जवळपास अचूक 2025 105% 108% अधिक

१६ वर्षांत फक्त ८ वेळा कमी पाऊस किंवा दुष्काळी स्थिती

१९५१ ते २०२५ पर्यंत १६ वर्षे मान्सूनच्या काळात एल निनोची स्थिती निर्माण झाली, परंतु मान्सूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडून दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची घटना केवळ ८ वेळाच घडली. एल निनोमुळे मान्सूनचे सर्वात वाईट वर्ष १९७२ हे होते, त्या वर्षी ७७.७% पाऊस झाला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *