![]()
घराच्या ओट्यावर बसून तरुणांना वाईट संगतीपासून दूर राहण्याचा सल्ला देणे एका ५० वर्षीय व्यक्तीच्या जीवावर बेतले आहे. मुकुंदवाडी परिसरात एका १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलाने चाकूने सपासप वार करून रोहिदास दत्तू खकाळ (वय ५०) यांची अत्यंत निर्घृण हत्या केली. बुधवारी (८ जुलै) मध्यरात्री घडलेल्या या थरारक घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून, आता या हत्याकांडाचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या ५० वर्षीय व्यक्तीचा जीव घेतल्यानंतर हा १५ वर्षांचा मुलगा एखाद्या गुन्हेगारी चित्रपटातील ‘भाई’प्रमाणे कॉलर उडवत घटनास्थळावरून निघून गेल्याचे या व्हिडिओत आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीतून उघड झाले आहे. नेमका वाद कशावरून झाला? मुकुंदवाडी भागात सध्या नशापाणी करणाऱ्या टवाळखोरांचा वावर वाढला आहे. मृत रोहिदास खकाळ हे रात्रीच्या वेळी आपल्या घराच्या ओट्यावर बसून मित्रांसोबत गप्पा मारत असत. ते तिथे बसत असल्याने टवाळखोरांना त्या भागात फिरण्यास अडचण होत होती. तसेच, रोहिदास या मुलांना वाईट मार्गाला न जाण्याचा सल्लाही देत असत. त्यातच रोहिदास ओट्यावर बसून सिगारेट ओढत असल्याने या अल्पवयीन आरोपीला त्यांचा राग येत होता. याच किरकोळ कारणावरून दोघांमध्ये वारंवार खटके उडत होते. व्हिडिओत कैद झाला हत्येचा थरार बुधवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास खकाळ दांपत्य जेवण करून घरात थांबले होते. तेव्हा अचानक दरवाजावर थाप पडली. रोहिदास यांनी दरवाजा उघडताच बाहेर तो १५ वर्षांचा मुलगा उभा होता. “तुम्ही येथे बसून सिगारेट पीत जाऊ नका, नाही तर तुम्हाला सोडणार नाही,” अशी धमकी त्याने दिली. रोहिदास यांनी त्याला समजावत, “तू घरी जा, आम्हाला झोपू दे,” असे सांगितले. यावरून दोघांमधील वाद विकोपाला गेला. संतापाच्या भरात या मुलाने ओट्यावर चढून स्वतःजवळील चाकूने रोहिदास यांच्या पाठीवर सलग ३ ते ४ वार केले. वार वर्मी लागल्याने रोहिदास खाली कोसळले, तरीही आरोपीचा राग शांत झाला नाही. त्याने खाली पडलेल्या रोहिदास यांच्या पोटातही पुन्हा ३ ते ४ वेळा चाकू भोसकला. हत्येनंतर हा मुलगा कॉलर उडवत आणि ‘भाईगिरी’च्या थाटात तिथून निघून गेला. हा संपूर्ण थरार आता व्हिडिओच्या माध्यमातून समोर आला आहे. अल्पवयीन आरोपीवर आधीही ‘हाफ मर्डर’चा गुन्हा कुटुंबाचा एकमेव आधार हरपला; पोलिसांची कारवाई घटनेची माहिती मिळताच मुकुंदवाडी ठाण्याचे निरीक्षक विवेक सोनवणे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले असून त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. दुसरीकडे, या घटनेने खकाळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृत रोहिदास हे गेल्या ८ वर्षांपासून आजारी होते. त्यांची पत्नी राणी या लोकांची धुणीभांडी करून अत्यंत कष्टाने घराचा गाडा हाकत होत्या. मात्र, एका किरकोळ वादातून या मुलाने त्यांचा आधारच हिरावून घेतला आहे. हेही वाचा.. ऊसतोड मजुराचे अपहरण; चार दिवस छळ, तोंडात लघुशंका करून मारहाण:जखमी मजुरावर बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू उचलीचे 50 हजार रुपये परत न केल्याच्या कारणावरून ऊसतोड मजुराचे अपहरण करून त्याला 4 दिवस डांबून ठेवले. या काळात त्याला बेदम मारहाण करुन छळ केला. तोंडात लघुशंका केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी सुरुवातीला पोलिसांनी गुन्हा नोंद करुन घेतला नाही, असा आरोप आहे. देविदास कापसे(रा.उमापूर, ता.गेवराई) असे मारहाण झालेल्या ऊसतोड मजुराचे नाव आहे, तर अपहरणाची दुसरी घटना मांजरसुंबा घाटात घडली. संशयितांनी तरुणासह त्याच्या वडिलांचे अपहरण केले. त्यांना 2 दिवस डांबून 1.80 लाखांची खंडणी उकळली. सविस्तर वाचा..
Source link
संभाजीनगरमध्ये गुन्हेगारीचा कळस:सपासप वार करून अल्पवयीन आरोपीचा 'भाई' स्टाईलने पळ, हत्येचा थरारक VIDEO समोर