Headlines

आमचंच सरकार सावरकरांची फाइल दाबून ठेवतंय:आमदार सुधीर मुनगंटीवारांनी आपल्याच सरकारला दिला घरचा आहेर




“ज्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारावर आम्ही आयुष्य काढलं, आमचंच सरकार सावरकरांना भारतरत्न देण्याचा ठराव घ्यायला फाइल अशा पद्धतीने दाबून ठेवत असेल, तर त्याचा मला खेद आहे. मी सभागृहाची शपथ घेऊन प्रतिज्ञा करतो की, यानंतर मी हा मुद्दा कधीही उपस्थित करणार नाही,’ अशा शब्दांत भाजपचे ज्येष्ठ आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला. स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना “भारतरत्न’ देण्यासंदर्भात केंद्र सरकारकडे शिफारस करण्याचा ठराव वारंवार रखडत असल्याने मुनगंटीवार यांनी थेट संसदीय कामकाज मंत्र्यांच्या आणि सरकारच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. मुनगंटीवार यांनी सभागृहात बोलताना आकडेवारी आणि तारखांचा दाखला देत सरकारला धारेवर धरले. ५ मार्च २०२६ रोजी अशासकीय ठरावाचे उत्तर देताना तत्कालीन मंत्री जयकुमार राऊत यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याबाबत केंद्र सरकारकडे विधानसभेच्या माध्यमातून शिफारस करण्याचे आश्वासन दिले होते. ‘बीएसी’त चर्चा न झाल्याने ठराव रखडला : नार्वेकर विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी तातडीने हस्तक्षेप करत कुठल्याही अधिवेशनात कोणताही ठराव मांडण्यापूर्वी बीएसी (कामकाज सल्लागार समिती) मध्ये सर्व गटनेत्यांना पूर्वसूचना देणे आवश्यक असते. दुर्दैवाने आणि अनवधानाने या विषयावर बीएसीमध्ये चर्चा झाली नव्हती. त्यामुळे पूर्वचर्चेविना थेट ठराव सभागृहात आणणे संयुक्तिक वाटले नाही, म्हणूनच हा ठराव आज पटलावर आला नसल्याचे त्यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *