![]()
पिंपरी-चिंचवड येथील मोशी डेपोत कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली बुधवारी दुपारी दीड वाजता दबलेल्या ८ जणांचा शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजेपर्यंत थांगपत्ता लागला नाही. एकूण परिस्थिती पाहता आठही जणांचा जीव धोक्यात आहे. येथे सुमारे ४५ मीटर उंच कचऱ्याच्या डोंगराजवळ
.
पिंपरी-चिंचवडमध्ये गेली ४० वर्षे दररोज १२०० ते १३०० मेट्रिक टन कचरा गोळा होऊन मोशीतील ८५ एकर जागेत जमा होतो. येथे सध्या सुमारे ४५ मीटर उंच कचऱ्याचा डोंगर आहे. अँटोनी लारा रेनेयुएबल एनर्जी कंपनीने २१ वर्षाच्या करारारावर याठिकाणी ३०० कोटी रुपये खर्च करून वेस्ट टू एनर्जी प्रकल्प उभारला. पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाइन १ ऑगस्ट २०२३ रोजी प्रकल्पाचे उद्घाटन झाले. येथे दररोज ६०० ते ७०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून १२ ते १३ मेगावॅट वीजनिर्मिती करण्यात येते. या प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीचा पाया बुधवारी मुसळधार पावसाने कोसळला आणि इमारतीपासून ३० मीटरवर असलेला कचऱ्याचा डोंगर इमारतीत पुरासारखा शिरला. त्यात २३ कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकले. एकाचा मृत्यू झाला. तर आठ जण जणांचा शोध सुरूच आहे.
हे प्रश्न अनुत्तरित : कुणाचा बचाव होतोय?
- मृत भावेश वाणीचे (३३) मित्र राहुल लिंबा पाटील यांनी भोसरी एमआयडीसीमध्ये फिर्याद दाखल केली. मात्र, दोषी अधिकाऱ्यांवर अद्याप गुन्हा दाखल का नाही ?
- मनपा आयुक्तांनी दुर्घटनेला नैसर्गिक आपत्ती सांगत आताच कोणाला दोषी धरता येणार नाही असे सांगितले. आयुक्त नेमके कोणाला पाठीशी घालत आहेत?
- इमारत बांधकामास परवानगी कशी दिली?
- आपत्कालीन परिस्थितीत प्रशासकीय कामात एकत्रित समन्वय साधून वेगाने काम करण्यात दिरंगाई का?ढिगारा उपसण्यासाठी दीड दिवस केवळ ४ जेसीबी. नातेवाइकांच्या आक्रोशानंतर दहा जेसीबी, क्रेन आणले.