![]()
राज्यस्तरीय ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान २०२५-२६’मध्ये सलग दुसऱ्यांदा प्रादेशिक स्तरावर प्रथम क्रमांक मिळवून १० लाख रुपयांचे पारितोषिक पटकावलेल्या सटाणा बसस्थानकातील आगार कार्यशाळेत चिखल, दुर्गंधी, अस्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याच्या अपुऱ्या सुविधां
.
आगाराच्या कार्यशाळा आवारात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचून चिखलाचे साम्राज्य निर्माण होते. उन्हाळ्यात धुळीचा त्रास तर पावसाळ्यात चिखलामुळे कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामकाज करताना अडचणींचा सामना करावा लागतो. परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. याशिवाय बसस्थानकातील स्वच्छतागृहांची अपुरी स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधांचाअभाव यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. सटाणा बसस्थानकातून मुंबई, पुणे, इंदूर, धुळे, सूरत तसेच मध्यप्रदेश व राजस्थानकडे दररोज ४० ते ५० लांब पल्ल्याच्या आणि ४० ते ५० स्थानिक अशा सुमारे १०० बसगाड्यांची ये-जा होते. हजारो प्रवासी या बसस्थानकाचा वापर करतात. मात्र, मूलभूत सुविधांच्या अभावामुळे प्रवाशांमध्ये नाराजी वाढत आहे. कार्यशाळा आवारातील चिखलाचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी होत आहे.
मंत्र्यांकडे निवेदन दिले ^ बसस्थानकाच्या कार्यशाळा आवारात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात चिखल साचतो. तसेच बसस्थानक परिसरातील स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधांची स्थितीही समाधानकारक नाही. प्रवाशांना या मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. – बिंदू शर्मा, प्रदेश महामंत्री, भाजप किसान मोर्चा