Headlines

7 दुष्काळी गावांचा सिंचन योजनेत होणार समावेश:जलसंपदा मंत्री विखे पाटील यांचे अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीचे आदेश‎




माढा तालुक्यातील सीना – माढा उपसा सिंचन योजनेमध्ये वंचित राहिलेल्या दुष्काळी ७ गावांचा समावेश करणे, खैराव मानेगाव उपसा सिंचन योजनेच्या कामाला गती देणे आदीसह तालुक्याच्या सिंचन प्रश्नावर कार्यवाहीचे आदेश जलसंपदा मंत्र्यांनी दिले आहेत. जलसंधारण व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक संपन्न झाली. यावेळी सीना– माढा उपसा सिंचन योजना तसेच खैराव- मानेगाव उपसा सिंचन योजना संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. आमदार अभिजीत पाटील यांनी या प्रश्नावर पुढाकार घेऊन ही बैठक आयोजित केली होती. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या या सर्व मागण्या अत्यंत गांभीर्याने ऐकून घेतल्या. सीना- माढा व खैराव- मानेगाव उपसा सिंचन योजनेची कामे गतीने पूर्ण करण्यासाठी सकारात्मक निर्णय घेण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. माढा तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या सिंचनासंदर्भातील प्रलंबित प्रश्न पूर्णपणे सुटेपर्यंत आपला सातत्याने पाठपुरावा सुरू राहणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला. या बैठकीला आमदार नारायण पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे, अमोल गायकवाड, विजय भगत, शरद मोरे, प्रकाश चोपडे तसेच विभागाचे शासकीय अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. . सीना- माढा उपसा सिंचन योजनेपासून वंचित राहिलेली तालुक्यातील तुळशी, बावी, परितेवाडी, अंजनगाव (खे.), कुर्डू, अंबाड व पिंपळखुटे ही दुष्काळी सात गावे या योजनेत तातडीने समाविष्ट करणे. . योजनेवरील सुमारे २० वर्षे जुन्या व कालबाह्य झालेल्या मोटारींच्या जागी नवीन आणि आधुनिक क्षमतेच्या मोटारी बसविणे. . सीना नदीच्या बोगद्यात नियोजनबद्ध पद्धतीने पाणी सोडणे. . खैराव- मानेगाव उपसा सिंचन योजना तातडीने सुरू करून कार्यान्वित करणे. . प्रकल्पासाठी संपादित झालेल्या जमिनीवरील फळझाडांच्या प्रलंबित नुकसानभरपाईचे तातडीने वाटप करणे. . नदीकाठावरील विस्कळीत झालेली विद्युत व्यवस्था तातडीने सुरळीत करणे. आमदारांनी मांडल्या या प्रमुख मागण्या



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *