Headlines

डॉ. अरुण मोंढे विश्व हिंदू परिषदेचे संपर्क प्रमुख:अमरावती महानगर शाखेत विशेष नियुक्ती




अमरावती येथील प्रसिद्ध समाजसेवक डॉ. अरुण मोंढे यांची विश्व हिंदू परिषदेच्या (विहिंप) अमरावती महानगर शाखेतील विशेष संपर्क विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही घोषणा श्री क्षेत्र तपोवनेश्वर संस्थान, बोडणा येथे आयोजित विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या जिल्हास्तरीय अभ्यास वर्गात करण्यात आली. या अभ्यास वर्गाला विहिंपचे प्रांत संघटन मंत्री विष्णू देशमुख, जिल्हाध्यक्ष अनिल साहू, जिल्हा प्रचारक विशाल राऊत, सामाजिक समरसता विभागाचे संयोजक राजीव देशमुख, बजरंग दलाचे प्रांत सहसंयोजक बंटी पारवाणी आणि विहिंपचे सहमंत्री दीपक पाठक महाराज यांच्यासह जिल्हा व प्रखंडातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. डॉ. अरुण मोंढे यांनी यापूर्वी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष म्हणून यशस्वीपणे कार्यभार सांभाळला आहे. त्यांनी संघटन विस्तार, हिंदू समाजातील विविध घटकांशी समन्वय आणि सामाजिक उपक्रमांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या या अनुभवाचा लाभ विशेष संपर्क विभागाच्या माध्यमातून संघटनेला अधिक बळकटी देण्यासाठी होईल, असा विश्वास उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. डॉ. मोंढे यांच्या नियुक्तीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *