![]()
शुगर फॅक्टरीची साखर वाहतूक करतो म्हणून दोघा अज्ञातांनी बनावट वाहन कागदपत्रे, वाहनाचा बनावट क्रमांक आणि फास्टॅगचा वापर करून तब्बल १८.४७ लाखांची साखर लंपास केली होती. विजयनगरच्या ट्रान्स्पोर्टमार्फत तडवळ (ता. अक्कलकोट) येथील ओंकार कारखान्याची साखर बाराबकी (उत्तर प्रदेश) येथील बिस्कीट कंपनीस पोहोचवतो म्हणून ट्रान्स्पोर्ट मालकाचा विश्वास संपादन करून हा डल्ला मारला होता. अक्कलकोट दक्षिण पोलिसांत फेब्रुवारी महिन्यात दाखल गुन्ह्यातील आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश पोलिसांनी केला. तांत्रिक माहितीच्या आधारे चोरट्यांच्या मागावरील पोलिस पथकाने नऊ दिवस तपास करून बनारस येथून साखरेसह माल ट्रक ताब्यात घेऊन चौघा जणांच्या टोळीस अटक केली. साखर खरेदी करणाऱ्या व्यावसायिकाचा समावेश आहे. या गुन्ह्यामधील आरोपींनी सर्वप्रथम ब्लॅक बक ट्रान्सपोर्टचा अॅपच्या मदतीने मोबाईल क्रमांक मिळवून उत्तर प्रदेश लाईनचे काही भाडे आहे का? याबाबत विचारणा केली. फिर्यादीने तडवळ येथील ओकार शुगर फॅक्टरीची साखर बाराबकी (उत्तर प्रदेश) येथील बिस्कीट कंपनीला पाठवायची असल्याचे सांगितले. आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन करण्यासाठी गाडीचे कागदपत्रे पाठवून दिले. फिर्यादीच्या सांगण्यावरुन ओंकार कारखान्यातून ५० किलो वजनाची ८३३ साखरेची गोणी भरुन गाडी फेब्रुवारी महिन्यात रवाना झाली होती. त्यानंतर गाडीचे ड्रायव्हर व कल्निर यांनी फिर्यादी यांच्याकडून डिझेल, गाडी दुरुस्ती व इतर खर्चासाठी पैसे घेतले, असे फिर्यादी बिष्णोई यांनी तक्रारीत म्हटले आहे. कोणाचा मोबाइल चोरी अगर हरवल्यास तत्काळ सिमकार्ड बंद करावे. अशा सिमचा व मोबाइलचा वापर करून चोरटे अशाप्रकारचे गुन्हे करून अडकवू शकतात.
Source link
तडवळच्या कारखान्याने बाराबाकी येथे पाठवलेली साखर बनारसमध्ये विकली:बनावट कागदपत्रांद्वारे साखर वाहतूक, 18.47 लाखांचा गंडा