Headlines

अवैध वाहतुक कारवाईत‎‎१८ हजाराचा दंड वसूल‎, खामगावचे आगार व्यवस्थापक पवन टाले ॲक्शन मोडवर




खामगाव मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील वाढत्या अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी आगार व्यवस्थापक पवन टकले ॲक्शन मोडवर आले असून, उपप्रादेशिक परिवहन विभाग व महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने धडक मोहीम राबवत बसस्थानकाच्या २०० मीटर परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईत १८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. प्रवाशांना एसटी सेवेकडे वळवणे आणि महामंडळाच्या उत्पन्नात वाढ करणे या उद्देशाने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक तसेच मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी डॉ. प्रियंका नारनवरे यांच्या सूचनेनुसार राज्यभर ही मोहीम राबवण्यात येत आहे. वसस्थानकाच्या परिसरात वाहनांचे बेशिस्त पार्किंग होत असल्याने एसटी बसच्या ये जा करण्यास अडथळा निर्माण होतो तसेच प्रवाशांनाही मोठा त्रास सहन करावा लागतो. खामगावात वाहतूक पोलिस विभागाच्या सहकार्याने झालेल्या या कारवाईत आगार व्यवस्थापक पवन टाले, सुरक्षा व दक्षता अधिकारी जयंत कांडलकर, वाहतूक निरीक्षक पीयुष पाटकर, वाहतूक निरीक्षक मोहिनी पाटील, उप प्रादेशिक परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक मनोज शेळके, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अमोल सरकाटे यांच्यासह शहर पोलिस स्टेशनचे कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. नियमांचे उल्लंघन ; कारवाई सुरूच राहणार खामगाव बस स्थानक परिसर अधिक शिस्तबद्ध आणि प्रवासासाठी सुरक्षित होण्यासाठी बसस्थानकाच्या २०० मीटर परिसरात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांनी वाहने उभी करू नयेत. अन्यथा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध यापुढेही अशाच प्रकारची दंडात्मक कारवाई करण्यात येईल.- पवन टाले आगार व्यवस्थापक खामगाव l फोटो – खामगाव बसस्थानकावर कारवाईसाठी सज्ज आहे. – पवन टाले, आगार व्यवस्थापक, खामगाव. खामगाव बसस्थानकावर कारवाई करण्यासाठी सज्ज असलेले आगार व्यवस्थापक पवन टाले



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *