![]()
अभिनेता आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाची चर्चा सध्या मनोरंजन विश्वापेक्षा राजकीय वर्तुळात अधिक रंगली आहे. या लग्नावरून राज्याचे मंत्री नितेश राणे आणि मंत्री संजय शिरसाट यांनी आमिर खानवर निशाणा साधत गंभीर स्वरुपाची विधाने केली आहेत. या संपूर्ण प्रकरणाकडे “लव्ह जिहाद’च्या संदर्भातून पाहण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आल्याने राजकीय वातावरण तापले आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात हा वाद पेटण्याची शक्यता आहे. ‘लव्ह जिहाद’चे ब्रँड ॲम्बेसेडर- राणे मंत्री नितेश राणे यांनी आमिर खानच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य करताना थेट टीकास्त्र सोडले आहे. “जेव्हा समाजात अशा प्रकारच्या घटना घडतात, तेव्हा या लोकांकडे “लव्ह जिहाद’चे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून पाहायचे का, अशी चर्चा हळूहळू वाढत चालली आहे. त्यांनी हिंदू समाजाला आवाहन करताना, अशा व्यक्तींचे चित्रपट पाहण्यापूर्वी समाजाने गांभीर्याने विचार करावा, असा सल्लाही दिला आहे. समाजासमोर उघडे पाडा- शिरसाट या वादात उडी घेत मंत्री संजय शिरसाट यांनी आमिर खानला डोक्यावर घेणाऱ्यांवर जोरदार टीका केली. शिरसाट म्हणाले, “एक, दोन आता तिसरे लग्न झाले आहे. येत्या काही वर्षांत तो चौथे लग्न करेल, त्यांना जणू काही लग्नांचा परवानाच मिळाला आहे. अशा प्रवृत्तीच्या लोकांना आता समाजासमोर उघडे पाडण्याची वेळ आली आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
Source link
आमिरच्या तिसऱ्या लग्नावरून ‘लव्ह जिहाद’चा वाद:त्यांचे चित्रपट पाहण्यापूर्वी विचार करावा- राणे, येत्या काही वर्षांत तो चौथे लग्न करेल- शिरसाट