Headlines

गुंडांना मोक्का लागत नाही, तोपर्यंत श्रीरामपूर बंदच:आठ दिवसांत कठोर कारवाई करणार, एसपींच्या आश्वासनानंतर 4 तासांचे आंदोलन मागे‎



श्रीरामपुरात माणुसकीची हत्या होत असून शहराचा भविष्यकाळ धोक्यात आला आहे. पोलिसांचा गुंडांवर वचक राहिलेला नाही. जोपर्यंत गुन्हेगारांवर कठोर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई होत नाही, तोपर्यंत श्रीरामपूर शहर बेमुदत बंदच राहील, असा आक्रमक पवित्रा सर्वपक्षीय नेते

.

हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया यांच्या हत्येच्या निषेधार्थ रविवारी पोलीस ठाण्यात तब्बल चार तास तणावपूर्ण आंदोलन पाहायला मिळाले. एसपी स्वतः येत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका घेत संतप्त नागरिकांनी मृतदेह पोलीस ठाण्याच्या आवारात आणून ठेवला. अखेर पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी आठ दिवसांत कठोर कारवाई करू, असे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.

शनिवारी सायंकाळी व्यापाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार रविवारी हजारो नागरिक पोलिस ठाण्याबाहेर जमा झाले. यात उर्वरित पान ४

पोलिस अधीक्षक सुदर्शन यांनी आठ दिवसांत कारवाईचे आश्वासन दिले असले, तरी त्यावर व्यापारी आणि नागरिकांचे समाधान झालेले नाही. शहरातील टोळ्यांवर आणि गुन्हेगारांवर ‘मोक्का’ लावून त्यांना गजाआड केले जात नाही, तोपर्यंत श्रीरामपूर शहर बंद ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते कायम ठेवण्यात आला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *