![]()
येथील प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या रत्नाई चषक राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत पाचशे पेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला. मंडळाच्या अध्यक्षा स्वरुपाराणी मोहिते पाटील यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होऊन स्पर्धेचा समारोप झाला.
.
श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी उपाध्यक्ष पोपट भोसले-पाटील, सचिव बिभीषण जाधव, सर्व संचालक, राष्ट्रीय मानांकन प्राप्त खेळाडू अनन्या बाळापुरे, सरिस्का बावळे, सई बावळे, सार्थक राऊत, श्रीराम राऊत, ओम राऊत, विनय रणसुंबे, आर्यन माने देशमुख, विनीत रणसुंबे, हवाले प्रमुख उपस्थितीत होते. या स्पर्धेत ३० कॅश प्राईज, ६० ट्रॉफीज, ६० मेडल तसेच प्रत्येक गटात २० पेक्षा अधिक बक्षिसे देण्यात आली. प्रथम क्रमांकास रुपये १००१ रुपये, द्वितीय ८०१ रुपये, तृतीय ७०१ रुपये, चौथा ६०१ रुपये, पाचवा ५०१ रुपये, सहा ते दहा क्रमांकास सन्मानचिन्ह व अकरा ते वीस क्रमांकास मेडल अशी बक्षिसे देण्यात आली.
स्पर्धेतील गटनिहाय प्रथम पाच क्रमांक पुढील प्रमाणे (१० वर्ष खुला गट) कृष्णराज पताळे, अजिंक्य कांबळे, जय राठी, हर्षवर्धन अरकल, शिवरत्न गोरे, (१० वर्ष माळशिरस तालुका गट), स्मित काटकर, प्रणव भोसले, अभय जगताप, विक्रम भोसले,आरुष माने. (१५ वर्ष खुला गट), युवराज गायकवाड, विहान कोंगारी, राजवर्धन काळे, प्रणव मजगे, आयुष उपाडे, (१५ वर्ष ), सार्थक राऊत, विनय रणसुंबे, अनन्या बाळापुरे, श्रीराम राऊत, सानवी वाघमोडे. (खुला गट), देवदत्त पटवर्धन, प्रसन्न जगदाळे, शौर्य साळुंखे, आदिराज म्हेत्रे, अभिराज पवार. (खुला गट), अनिरुद्ध गुरव, प्रतीक इंगळे, समाधान सूर्यवंशी, अनिल सोनवणे, ओम राऊत यांनी यश मिळविले.