![]()
अमरावती महानगर पालिकेतील एकूणच कामकाजाची आधीच माहिती करून घेत नवनियुक्त आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी रविवारी कामकाजाची सुत्रे हाती घेतल्यानंतर प्रथम सर्व अधिकारी, विभाग प्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी आपण शहरवासीयांच्या जागी आहोत, असा विच
.
अमरावती मनपा आयुक्तपदी डॉ. मंगेश गोंदावले रुजू महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी रविवारी पदभार स्वीकारला. माजी आयुक्त वर्षा लढ्ढा यांच्याकडून त्यांनी अधिकृतरित्या कार्यभार स्वीकारत शाश्वत व नागरिकाभिमुख विकासासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली. डॉ. गोंदावले यांनी सांगितले की, अमरावती शहराच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून कार्य केले जाईल. विकास प्रकल्प, स्वच्छता, पायाभूत सुविधा, नागरिकांना गुणवत्तापूर्ण सेवा आणि प्रशासनातील पारदर्शकता यांना सर्वोच्च प्राधान्य देत विकासकामांना अधिक गतिमान करण्यात येईल.