Headlines

शिरूरमध्ये 56 ग्रॅम एमडी जप्त, दोघांना अटक:11.90 लाखांचा मुद्देमाल हस्तगत; आठवड्यातील तिसरी मोठी कारवाई




पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ५६ ग्रॅम एमडी हा प्रतिबंधित अमली पदार्थ जप्त केला आहे. शिरूर परिसरात ही कारवाई करण्यात आली असून, यात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एकूण ११ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईत प्रदीप विठ्ठल कोरेकर आणि साईनाथ जनार्दन भोसले या दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून ५६ ग्रॅम एमडी, एक दुचाकी आणि दोन मोबाईल असा एकूण ११ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या एमडीची किंमत सुमारे ११ लाख २० हजार रुपये, तर दुचाकीची किंमत ३० हजार रुपये आहे. पुणे ग्रामीण पोलिसांकडून ‘नशामुक्त भारत’ आणि ‘ड्रग्ज फ्री महाराष्ट्र’ या उपक्रमांतर्गत अमली पदार्थांची विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेची पथके अशा तस्करांवर सातत्याने कारवाई करत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला शिरूर परिसरात एमडीची विक्री होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, स्थानिक गुन्हे शाखेची अमली पदार्थांविरोधातील आठवडाभरातील ही तिसरी मोठी कारवाई आहे. यापूर्वी ११० ग्रॅम आणि १९ ऑगस्ट रोजी २० ग्रॅम एमडी जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. अमली पदार्थांची विक्री अथवा वाहतुकीबाबत नागरिकांनी निर्भयपणे माहिती द्यावी, माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असे आवाहन पुणे ग्रामीण पोलिसांनी केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिरूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *