Headlines

पंढरपुरात 10 वर्षांनंतर अतिक्रमण हटाव मोहीम:रस्ते झाले मोकळे, आषाढीच्या तोंडावर 4 जेसीबी अन् 2 ट्रॅक्टरच्या मदतीने कारवाई‎




आषाढी यात्रेच्या तोंडावर पंढरपूर शहरात गेल्या ८-१० दिवसांपासून नगर परिषदेच्यावतीने धडक अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जात आहे. तब्बल व १० वर्षांनंतर एवढी मोठी आणि व्यापक कारवाई झाल्याने शहरातील प्रमुख रस्ते आता रुंद आणि मोकळे दिसू लागले आहेत. अनेक वर्षांची जुनी अतिक्रमणे भुईसपाट करण्यात आल्याने सामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान, सामान्य लोकांची अतिक्रमणे काढली, आणखीन कारवाई चालूच आहे, आता शहरातील बड्या धेंडांच्या अतिक्रमणांवरही अशीच हातोडा पडणार का? अशी विचारणा आता नागरिकांमधून होत आहे. आषाढी यात्रा १२ दिवसांवर येऊन ठेपलेली आहे. यंदाही यात्रेसाठी १२ ते १५ लाख वारकरी येतील अशी शक्यता गृहीत धरून प्रशासन यात्रेच्या कामासाठी लागलेले आहे. अधिकाऱ्यांच्या विशेष तीन पथकांनी केली कारवाई . टीम क्रमांक १: याचे नेतृत्व सांगोला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांनी केले. . टीम क्रमांक २ आणि ३: याची जबाबदारी मोहोळ न.प.चे मुख्याधिकारी डॉ. योगेश डोके यांच्याकडे सोपवण्यात आली होती. मोहोळ न.प. चे स्थापत्य अभियंता गणेश बागल, अक्कलकोट न.प.चे स्थापत्य अभियंता अभिषेक काकडे, अक्कलकोट न.प.चे नगर रचनाकार उत्कर्ष उकरंडे यांचा समावेश होता. तब्बल १० वर्षानंतर एवढी व्यापक कारवाई होत आहे, पंढरपूर न. प. चे मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या मोहिमेसाठी प्रशासनाने २ ट्रॅक्टर, ४ जेसीबी आणि १६ मजुरांच्या मनुष्यबळाचा वापर करून ही धडक कारवाई पूर्ण केली. पंढरपूर शहरातील अतिक्रमणे हटवल्यामुळे रस्ते विस्तीर्ण झाले आहेत. या भागातील अतिक्रमणे काढल्याने भाविकांची कोंडी होणार नाही. सर्व संतांच्या पालख्या शहरात येत असतात.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *