Headlines

पावसाने दांडी मारल्याने चारा संकट;प्रति गुंठ्यासाठी मोजावे लागताहेत 1500 रु:53 लाख पशुधनाचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादकांचा खर्च वाढल्याने चिंतेत भर‎




मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी पावसाने दांडी मारल्याने कडवळ चारा प्रति गुंठा मागील वर्षी ९०० रुपये तर यंदाच्या वर्षी १५०० रुपये मोजावे लागत आहेत. सदर चाऱ्याचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे तालुक्यासह जिल्ह्यातील पशुपालकांना मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी दुपटीने चाऱ्यासाठी किंमत मोजावी लागण्याची वेळ आली आहे. तर जिल्ह्यातील गाय म्हैस १२ लाख ४१ हजार ८५८ तर शेळ्या मेंढ्या १० लाख ८७ हजार ८९०, घोडा गाढव उंट २६०२ तर डुकरे १० हजार ४५७ अशा एकूण २३,४२,८०७ इतक्या तर ३०,५६,८०९ कोंबड्यां इतक्या आहेत. अशा एकूण ५३,९९,६१६ चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. सोलापूर जिल्ह्याला यंदाच्या वर्षी दुष्काळाचा सामना करावा लागणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. भारतीय हवामान विभागाने सुधारित अंदाजात म्हटले की, यंदा मान्सूनदरम्यान सरासरी पावसाच्या तुलनेत पाऊस कमी होऊ शकतो. मागील दहा दिवसापासून मुंबई-पुणे येथे पावसाने दमदार सुरुवात केली आहे. मात्र सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे हवामानामध्ये बदल होऊन नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी कडवळ, मका सह इतर चाऱ्याचे दर गगनाला भिडल्याने पशुपालकाच्या चिंतेत वाढ झाली आहे. एकीकडे दुधामध्ये घट होऊ लागली आहे, तर दुसरीकडे तालुका एकूण जनावरे माळशिरस १३,२७,८२२ सांगोला ७,८५,१८७ द.सोलापूर ६,७७,७५० पंढरपूर ५,५५,८३६ मंगळवेढा ४,५७,२२२ माढा ४,४४,२७८ मोहोळ ४,१६,०९७ करमाळा २,७४,४८४ बार्शी २,४७,४३६ अक्कलकोट १,४८,१६० उ.सोलापूर ६५,३४४ एकूण ५३,९९,६१६ ^मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी उशिरा तुरळक ठिकाणी पावसाने सुरुवात केली आहे. मात्र दमदार पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचे दर गगनाला भिडले आहेत. दूध उत्पादनापेक्षा उत्पादन खर्च जास्त होत आहे. मात्र दूध दरामध्ये दरवाढ झाली नाही. पशुधन जोपासण्यास अधिक खर्च होत आहे. मधुकर लेंगरे, पशुपालक ^शेतकऱ्यांनी चारा जपून वापरावा. चाऱ्याची नासाडी करू नये. चारा कुट्टी करून वापरावा. शेतामधील चाऱ्याचा मुरघास करून साठवण करून ठेवावा. चाऱ्याची कमतरता भासत असेल तर शेतकऱ्यांनी चारा विकू नये. अनिल तांबे, जिल्हा उप आयुक्त पशुसंवर्धन व दूध उत्पादन दुसरीकडे चाऱ्याचे दर गगनाला भिडल्याने उत्पादनापेक्षा उत्पादन खर्चामध्ये वाढ होत आहे. पशुपालन शेतकऱ्यास दूध दरासह इतर शेतीउत्पादन दरामध्ये वाढ करून दिलासा द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी दमदार पावसाने वेळेत हजेरी न लावल्यास पशुधनांसाठी पिण्याच्या पाण्यासह चाऱ्यांबरोबरच नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी देखील संघर्ष करण्याची वेळ येणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *