Headlines

आरोग्य कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा‎:कर्मचाऱ्यांनी दिले राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांना मागण्यांचे निवेदन




फत्तेपूर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी-कर्मचारी महासंघाने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. यासंदर्भात सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांना निवेदन सादर करुन मागण्यांवर चर्चा करण्यासाठी तातडीने बैठक आयोजित करण्याची मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचारी २००५ पासून आरोग्य विभागात कार्यरत आहे. कोरोना महामारीच्या काळात राज्याला कोविडच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष करता येणार नाही, अशी भूमिका महासंघाने निवेदनातून मांडली आहे. मागण्यांसंदर्भात महासंघामार्फत वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र, आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या कार्यालयाकडून या मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप महासंघाने केला आहे. कर्मचाऱ्यांच्या संघटनेने सादर केलेल्या मागण्यांच्या पत्रांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बोर्डीकर यांना निवेदन दिले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *