.


शहरालगत मापरवाडी शिवारातील उगले मळा परिसरात गुरुवारी (दि. १५) पहाटे पिंजऱ्यात दीड वर्षांची मादी बिबट्या जेरबंद झाली. पंधरा दिवसांतील हा पाचवा बिबट्या जेरबंद झाला आहे.
८ ऑक्टोबर रोजी ढग्या डोंगराच्या पायथ्याशी दोन बिबटे भरदिवसा फिरताना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाले होते. नगरसेवक बाळासाहेब उगले यांच्या पाठपुराव्यानंतर वन विभागाने गट क्र. ८० मध्ये पिंजरा लावला. गुरुवारी पहाटे यात मादी बिबट्या अडकली खरी; मात्र तिच्या सुटकेसाठी दुसऱ्या बिबट्याने पिंजऱ्याबाहेर चक्क माती उकरून काढली. बिबट्याची मादी पिंजऱ्यात जेरबंद झाल्यानंतर उर्वरित पान ६
प्रतिनिधी | लासलगाव विंचूर येथील किसनवाडी परिसरात गुरुवारी (दि. १५) विहिरीत पडलेल्या आठ ते नऊ महिन्यांच्या बिबट्याच्या बछड्याला वन विभाग आणि वन्यजीव बचाव पथकाने सुरक्षितपणे बाहेर काढत जीवदान दिले. विंचूर किसनवाडी येथील मधुकर सालकडे यांच्या विहिरीत बिबट्याचा बछडा पडल्याची माहिती मिळताच निफाड वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पथकाने तातडीने बचावकार्य सुरू करून बछड्याला विहिरीतून सुखरूप बाहेर काढले. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, पुढील कार्यवाहीसाठी त्याला शासकीय वाहनाने निफाड वन उद्यान येथे नेण्यात आले आहे.
जायखेडा | मौजे आनंदपूर येथील शेतकरी चंद्रकांत सुभाष अहिरे यांच्या पोल्ट्री फार्मवर सलग हल्ले चढवून सुमारे २५० कोंबड्यांचा फडशा पाडणारा हा बिबट्या अखेर वन विभागाच्या पिंजऱ्यात अलगद अडकल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. चंद्रकांत अहिरे यांच्या शेतातील गट नंबर १२७ मध्ये पोल्ट्रीत बिबट्याने अचानक कोंबड्यांवर हल्ला केला होता. घटनेची माहिती मिळताच वन विभागाने घटनास्थळी पिंजरा लावला होता. मध्यरात्री बिबट्या भक्ष्याच्या शोधात असताना पिंजऱ्यात अडकला.