Headlines

Vijay Wadettiwar Alleges 400 Crore Skill Development Scam In Nagpur


राज्यातील 15 ते 45 वयोगटातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगारक्षम बनवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रमोद महाजन कौशल्य व उद्योग विकास अभियानात तब्बल 400 कोटी रुपयांचा महाघोटाळा झाला आहे. नागपूर आणि विदर्भात भाजपच्या एका बड्या पदाधिकाऱ्याच्या आशीर्वादाने

.

नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत वडेट्टीवार यांनी कौशल्य विकास विभागातील भ्रष्टाचार, एमपीएससीमधील कथित ‘सेटिंग’ व गैरव्यवहार, एससी-एसटी-ओबीसी-अल्पसंख्याक विचारमंथन शिबिर आणि प्रशांत भूषण यांच्या विधानावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला.

एकही विद्यार्थी नाही, तरी बिले लाटली; 400 कोटींचा कौशल्य विकास घोटाळा

कौशल्य विकास विभागातील भ्रष्टाचाराची कागदपत्रे माध्यमांसमोर मांडत विजय वडेट्टीवार म्हणाले, “15 ते 45 वयोगटातील तरुणांना कौशल्यवर्धन देऊन किमान 75 टक्के उमेदवारांना प्रत्यक्ष नोकरी मिळवून देणे नियमानुसार बंधनकारक होते. मात्र नागपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वर्धा आदी जिल्ह्यांत ‘पुष्पांजली फाउंडेशन’ व इतर संस्थांनी प्रत्यक्षात कोणतेही प्रशिक्षण वर्ग चालवलेच नाहीत.”

उपाध्यक्षांच्या तपासणीत भंडाफोड

“डिसेंबर 2025 मध्ये अमरावती विभागाचे उपायुक्त दिलीप ठाकरे यांनी अचानक केंद्राची पाहणी केली असता तिथे एकही विद्यार्थी किंवा प्रशिक्षक आढळला नाही. त्यानंतर यवतमाळ उपायुक्तांच्या स्वतंत्र चौकशीतही प्रशिक्षण केंद्र बंद असल्याचे उघड झाले. 360 हून अधिक बोगस उमेदवारांची नावे आणि ओळखपत्र माहिती कुठूनतरी जमा करून परस्पर अनुदान लाटण्यात आले.”

एसओपी आणि नियमांचे उल्लंघन

“या संस्था एमएसएसडीएस (MSSDS) कडे सूचीबद्ध नव्हत्या. त्यांना कोणताही अधिकृत ट्रेनिंग बॅच नंबर (TBN) नव्हता, विद्यार्थ्यांची दैनंदिन बायोमेट्रिक हजेरी नव्हती, आणि कोणालाही रोजगार दिला गेला नाही. तरीही 2015-16 पासून आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची बिले मंजूर करून तब्बल 400 कोटी रुपये हडप करण्यात आले. संपूर्ण राज्याची चौकशी केल्यास हा आकडा 1 हजार कोटींवर जाईल.”

भाजप नेत्याचा थेट हात?

“अमरावतीतील येवदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला, किमान सहा ठिकाणी तक्रारी गेल्या; मात्र तपास पुढे सरकत नाही. कारण अटक झाली तर संस्था चालवणाऱ्या भाजप महापालिकेतील एका बड्या पदाधिकाऱ्याच्या खात्यात गेलेले पैसे उघड होतील. त्यामुळे राजकीय दबावातून आरोपींना वाचवले जात आहे. या प्रकरणाची एसआयटी मार्फतच चौकशी झाली पाहिजे.”

एमपीएससीमध्ये पैसे मोजून सेटिंग; नागपूरच्या एकाच केंद्रावरून टॉपर्स कसे?

स्पर्धा परीक्षांच्या गोंधळावर आणि खाजगीकरणावर बोलताना त्यांनी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी मांडलेल्या मुद्द्यांचा पुनरुच्चार केला. “एमपीएससी व इतर सरळसेवा परीक्षांमध्ये प्रचंड अनागोंदी माजली आहे. सतीश वाघमारे यांच्या कारभारावर आधीपासून प्रश्नचिन्ह आहे. नागपूरच्या एकाच केंद्रावरून 62 पैकी 24 टॉपर कसे येतात? ज्या मुलांना इतर परीक्षांमध्ये दोन-चार गुण मिळतात, ती इथे थेट टॉपर होतात. सेंटर मॅनेज करून, पैसे घेऊन भरती केली जात आहे. यात केवळ अधिकारी बदलून चालणार नाही, तर संपूर्ण यंत्रणेचे शुद्धीकरण करावे लागेल.”

400 पदाधिकाऱ्यांचे शिबिर; वंचित समाजाला एकत्र आणून मतचोरी उघड करणार

काँग्रेस पक्षाच्या आगामी रणनीतीची माहिती देताना वडेट्टीवार म्हणाले, “महाराष्ट्रातील उपेक्षित समाजाला एकत्र आणण्यासाठी ४०० प्रमुख पदाधिकाऱ्यांचे विशेष चिंतन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यात एससी, एसटी, ओबीसी आणि अल्पसंख्याक या चारही प्रवर्गातील प्रत्येकी 100 प्रतिनिधी सहभागी होत आहेत.”

महापुरुषांच्या विचारांची सांगड

“डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, महात्मा गांधी, डॉ. एपीजे अब्दुल कलाम आणि भगवान बिरसा मुंडा यांनी समाजाला जोडण्याचे काम केले. मात्र सत्ताधारी आज समाजात फूट पाडत आहेत. या शिबिरात शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई, बेरोजगारी आणि राहुल गांधी यांनी पुढाकार घेतलेला ‘मतचोरी’चा लढा घराघरांपर्यंत कसा पोहोचवायचा, यावर कृती आराखडा तयार केला जाईल.”

प्रशांत भूषण काय चुकीचे बोलले?; सत्तांतर झालेच पाहिजे!

ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांच्या ‘रेझिम चेंज’ (सत्ता बदल) विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. “मुख्यमंत्र्यांचे म्हणणे आहे की भारतात पाकिस्तान आणि नेपाळसारखी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. पण देशात लाखो नागरिक आणि तरुण रस्त्यावर का उतरत आहेत? ज्या सत्तेच्या काळात मतचोरी होते, मंदिरात चोरी होते, महागाईचा भडक उडतो, देश-राज्य कर्जाच्या खाईत लोटले जाते, महिलांवर अत्याचार होतात आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतात; ती सत्ता बदलण्याची मागणी करणे हा लोकशाहीत गुन्हा आहे का?”

जनतेच्या आंदोलनाला घाबरले

“कॅगच्या अहवालानंतर यूपीए सरकारच्या काळात देशात वातावरण निर्माण करणारे भाजपवाले आता जनतेचा आक्रोश पाहून घाबरले आहेत. शांततेत, हातात तिरंगा घेऊन निशस्त्र आंदोलन करणाऱ्या तरुणांवर दिल्लीत पोलीस लाठीमार करतात, दिल्लीला छावणीचे स्वरूप दिले जाते. जनता आता एकत्र येत असून सत्ता उलथवून लावेल, या भीतीपोटीच सत्ताधारी विरोधकांवर बिनबुडाचे आरोप करत आहेत,” असा घणाघात विजय वडेट्टीवार यांनी शेवटी केला.

————————————————

हेही वाचा…

न्यायासाठी पुन्हा तुरुंगात जायलाही तयार!: संजय राऊतांचा हल्लाबोल, बांगलादेश-श्रीलंकेचे दाखले देत ‘रेझिम चेंज’च्या आंदोलनाचे जोरदार समर्थन

“देशाचे सर्वोच्च न्यायालय सर्वोच्चच आहे आणि संविधानावर आमची गाढ श्रद्धा आहे. ज्येष्ठ वकिलांच्या सल्ल्यानुसार न्यायालयाचा अवमान झाला अशी भावना असेल तर मी दिलगिरी व्यक्त करून माफीही मागितली आहे. परंतु आता सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला न्याय द्यावा. साडेचार वर्षांपासून शिवसेनेचा पक्ष आणि चिन्ह घटनाबाह्य पद्धतीने तिसऱ्याच पक्षाला बहाल करून आम्हाला मूलभूत अधिकारांपासून वंचित ठेवले गेले आहे. चाळीस आमदारांच्या अपात्रतेचा फैसला अद्याप प्रलंबित आहे. मतदारयादीतून कोट्यवधी मतदारांची नावे वगळून लोकशाहीची उघड हत्या केली जात आहे. या अन्यायाविरोधात लढताना मला जर पुन्हा तुरुंगात जावे लागले, तरी माझी कोणतीही तक्रार नाही; मी तुरुंगात जाण्यास तयार आहे,” असा आक्रमक पवित्रा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत घेतला. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.