मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आणि लोकशाहीच्या चारही स्तंभांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून आंदोलन छेडणाऱ्या सीजेपी (CJP) पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्यावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (सचिन खरात गट) राष्ट्रीय अध्यक्ष सचि
.
दिपकेंचे विमान दौरे कुणाच्या पैशांवर?
आपल्या आंबेडकरी चळवळीतील संघर्षाचा दाखला देत सचिन खरात यांनी दिपकेंच्या जीवनशैलीवर प्रश्न उपस्थित केले. “मी महाविद्यालयीन जीवनापासून गेली 35 ते 40 वर्षे आंबेडकरी चळवळीत प्रामाणिकपणे काम करत आहे. 20 वर्षे नोकरी करत रस्त्यावरील आंदोलने केली, जनतेच्या न्यायासाठी लढा उभारला आणि आजही मी रेल्वेने किंवा एसटीच्या ‘लालपरी’ने सामान्य प्रवाशासारखा प्रवास करतो, हे राज्यातील कार्यकर्त्यांना चांगले ठाऊक आहे.”
पार्टी काढताच फ्लाईट्सचे दौरे
“दुसरीकडे, काल-परवा सोशल मीडियावरून सीजेपी नावाची पार्टी स्थापन करणारे अभिजीत दीपके सतत विमानांमधून (Flights) फिरताना दिसत आहेत. आंदोलन उभे राहताच इतका पैसा आणि विमानांचे दौरे करण्यासाठी लागणारा प्रचंड निधी कुठून येत आहे? आंदोलनाच्या पडद्यामागे नक्की कोणती शक्ती आर्थिक रसद पुरवत आहे, हे जनतेसमोर आले पाहिजे.”

कपिल सिब्बल यांनी जाहीर केलेले 1 कोटी घेतले का?
दिपकेंना मिळालेल्या कायदेशीर निधीवर संशय व्यक्त करताना खरात म्हणाले, “ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. कपिल सिब्बल यांनी या आंदोलनासाठी कायदेशीर निधी म्हणून तब्बल 1 कोटी रुपये जाहीर केले होते. मुळात अभिजीत दीपके यांची राजकीय पार्टी अजून अधिकृतपणे नोंदणीकृत झालेली नाही. जर पक्षच रजिस्टर नाही, तर हा 1 कोटी रुपयांचा निधी त्यांनी स्वीकारला का?”
पारदर्शकतेचा हिशेब द्या!
“दीपके सातत्याने पारदर्शकतेच्या गप्पा मारतात. देशात लहान-मोठ्या गणेशोत्सव मंडळांना किंवा सार्वजनिक प्रतिष्ठानलासुद्धा देणगीदारांची आणि खर्चाची रीतसर नोंद ठेवावी लागते, धर्मादाय आयुक्तांकडे हिशोब द्यावा लागतो. मग दिपकेंनी हा 1 कोटींचा निधी कोणाच्या वैयक्तिक खात्यात घेतला? तो कायदेशीर मार्गाने घेतला की बेकायदेशीर? आणि तो कसा खर्च केला? या सर्व आर्थिक व्यवहारांची जाहीर मांडणी त्यांनी करावी.”
लोकशाहीच्या चारही स्तंभांवर संशय अन् बांगलादेशची प्रेरणा?
आंदोलनातील विधानांवर आणि कार्यपद्धतीवर त्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. “अभिजीत दीपके हे केवळ निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करत नसून, संसद, प्रशासन, न्यायपालिका आणि प्रसारमाध्यमे या लोकशाहीच्या चारही स्तंभांवर अविश्वास निर्माण करण्याचे काम करत आहेत. ही बाब देशाच्या सुरक्षेच्या आणि अखंडतेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आहे.”
हा बांगलादेश किंवा पाकिस्तान नाही
“नुकतीच दिपकेंनी दिल्लीत नेहा वोरा नावाच्या मुलीसोबत पत्रकार परिषद घेतली. त्यात त्या आंदोलक मुलीने बांगलादेशमधील हिंसक आंदोलनातून प्रेरणा घेत असल्याचे उघडपणे जाहीर केले. हे थेट बांगलादेशसारख्या अराजकतेचे समर्थन करणे आहे. दीपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की, हा बांगलादेश किंवा पाकिस्तान नाही; हा भारत देश आहे. इथे माझे दैवत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला सर्वोत्तम संविधान दिले आहे.”
आंदोलनाला कायद्याची चौकट हवी
“संविधानाने प्रत्येक नागरिकाला सरकारविरोधात शांततेत आंदोलन करण्याचा समान हक्क दिला आहे. मात्र, त्यासाठी प्रशासनाची रीतसर परवानगी घेणे, आंदोलनाचे नियम पाळणे ही संविधानाने घालून दिलेली चौकट आहे. जाणीवपूर्वक नियम धुडकावून देशात अशांतता आणि अराजकता निर्माण करण्याचा डाव आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नाही.”
शासनाने तत्काळ विशेष चौकशी करावी -सचिन खरात
“लोकशाहीच्या संस्थांवर घाला घालणाऱ्या आणि संशयास्पद मार्गाने निधी गोळा करणाऱ्या या संपूर्ण प्रकरणाची गृह मंत्रालयाने आणि तपास यंत्रणांनी सखोल चौकशी करावी. या आंदोलनामागील विदेशी अथवा अंतर्गत आर्थिक लागेबांधे शोधून काढून जनतेसमोर सत्य आणावे,” अशी आग्रही मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (खरात गट) वतीने सचिन खरात यांनी शेवटी केली.
———————————
हेही वाचा…
अभिजीत दिपके यांना अटक, आज कोर्टात पेशी: 8 दिवसांत दुसरी कारवाई, तिरंगा रॅलीपूर्वी घेतले होते ताब्यात; नेहा बोराची सुटका

‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस सूत्रांनुसार, त्यांना आज दुपारी १२:०० वाजता विशेष कार्यकारी दंडाधिकारी न्यायालयात (Special Executive Magistrate’s Court) हजर केले जाणार आहे. कनॉट प्लेस येथे आयोजित ‘लेहरा दो तिरंगा’ रॅलीच्या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी दीपके यांना ताब्यात घेण्यात आले होते. गेल्या आठ दिवसांत त्यांच्यावर कारवाई होण्याची ही दुसरी वेळ आहे; याआधी १० ऑक्टोबर रोजी त्यांना दिल्ली विमानतळावर एका विमानातून ताब्यात घेण्यात आले होते, मात्र दुसऱ्या दिवशी त्यांची सुटका करण्यात आली होती. येथे वाचा संपूर्ण बातमी