![]()
माळशिरस तालुक्यातील फळवणी येथे स्मशानभूमीच्या जागेच्या मालकीवरून रविवारी मोठा पेच निर्माण झाला. संतप्त नातेवाईक व ग्रामस्थांनी मयत महिला तुळसाबाई लोहार (वय ८५) यांचा मृतदेह थेट ग्रामपंचायत कार्यालयासमोर आणून तेथेच अंत्यविधीची तयारी सुरू केल्याने गावा
.
फळवणी येथील तुळसाबाई लोहार यांचे रविवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. सकाळी अंत्यविधीसाठी समाजबांधवांनी तेथील ओढ्यालगतच्या स्मशानभूमीत सरपण टाकले. मात्र तेथील स्थानिक शेतकरी आवताडे यांनी ही जागा वैयक्तिक मालकीची असल्याचा दावा करत तेथे अंत्यविधीस विरोध केल्याने तणाव निर्माण झाला. या प्रकाराने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी मृतदेह ग्रामपंचायत कार्यालयासमोर आणून तेथेच अंत्यविधी करण्याची तयारी केली. ही माहिती समजताच वेळापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ग्रामपंचायत व महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करून ग्रामस्थांची समजूत काढल्यानंतर स्मशानभूमीत अंत्यविधी शांततेत पार पडला.
प्रशासनाचा हलगर्जीपणा कारणीभूत ^दोन वर्षांपूर्वी स्मशानभूमीच्या प्रश्नासाठी मी उपोषण केले होते. त्यावेळी प्रशासनाने आश्वासन दिले, मात्र प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही झाली नाही. आजच्या तणावपूर्ण परिस्थितीस प्रशासनाचाच हलगर्जीपणा कारणीभूत आहे. – ज्योतीराम आवताडे, सामाजिक कार्यकर्ते
जागेचा प्रस्ताव पाठवा ^स्मशान भूमी असलेली जागा ही ओढ्याची म्हणजेच शासकीय असून याच ठिकाणी स्मशानभूमी बांधण्यासाठी आज ग्रामसभेत ठराव झाला आहे. या जागेचा प्रस्ताव पाठवा आपण पुढील मंजुरीची कारवाई करू असे गट विकास अधिकारी यांनी सांगितले आहे. – अमर आतार, ग्रामसेवक, फळवणी