![]()
आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांवर आज सकाळी मोठा अनर्थ ओढवला आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत पायी चालत निघालेल्या वारकऱ्यांना जेजुरी परिसरातील भोंगळे मळा येथे एका भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून, अन्य तीन वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. नेमका अपघात कसा झाला? सध्या राज्यभरातून लाखो वारकरी ऊन-पावसाची तमा न बाळगता पायी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडचा मुक्काम आटोपून आज जेजुरीच्या दिशेने मार्गस्थ झाली होती. सकाळच्या वेळी अनेक वारकरी जेजुरीच्या दिशेने पायी चालत निघाले होते. या मार्गावर सुरक्षेच्या कारणास्तव एकाच बाजूने वाहने सोडली जात होती. प्राथमिक माहितीनुसार, जेजुरी नजीकच्या भोंगळे मळा परिसरात मागून आलेल्या एका भरधाव ट्रकने वारकऱ्यांच्या टेम्पोला आणि पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की यात तब्बल सहा वारकरी चिरडले गेले. ३ महिला वारकऱ्यांवर काळाचा घाला अपघात घडताच परिसरातील नागरिक आणि इतर वारकऱ्यांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले. जखमी झालेल्या सर्व सहा वारकऱ्यांना तातडीने नजीकच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान यापैकी तीन महिला वारकऱ्यांचा उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर उर्वरित तीन जखमी वारकऱ्यांवर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांचीही प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. रोहित पवारांकडून वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजनांची मागणी हेही वाचा.. तुमचंही नाव तर कटलं नाही ना?:’लाडकी बहीण’ योजनेतून 92 लाख महिला वगळल्या, ई-केवायसी न केल्याचा बसला सर्वाधिक फटका राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत मोठ्या प्रमाणावर लाभार्थ्यांची छाटणी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ताज्या आकडेवारीनुसार आतापर्यंत 92 लाख महिलांची नावे योजनेतून वगळण्यात आली आहेत. काही दिवसांपूर्वी ही संख्या सुमारे 80 लाख असल्याचे सांगण्यात आले होते, मात्र पडताळणीची प्रक्रिया पुढे सरकल्यानंतर अपात्र लाभार्थ्यांचा आकडा आणखी वाढला आहे. सुरुवातीला सुमारे 2.4 कोटी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला होता. मात्र आता जवळपास 38 टक्के लाभार्थी यादीबाहेर गेले आहेत. विशेष म्हणजे, सुमारे 14 हजार पुरुषांनीही या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केल्याचे पडताळणीत समोर आले असून त्यांनाही अपात्र ठरवण्यात आले आहे. सविस्तर वाचा..
Source link
पंढरपूरच्या वारीदरम्यान मोठी दुर्घटना:जेजुरीजवळ दिंडीतील ट्रकच्या धडकेत 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू, 4 जखमी