Headlines

ना प्रचार, ना सभा…तरी शाळा प्रतिनिधी पदासाठी चुरशीची लढत:शहरटाकळी विद्यालयामध्ये मतदान उत्साहात; 86 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद‎



विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनापासूनच लोकशाहीच्या मूल्यांची रुजवणूक व्हावी, त्यांना निवडणूक प्रक्रियेची प्रत्यक्ष माहिती मिळावी आणि लोकशाहीचा अनुभव घेता यावा, या उद्देशाने कर्मयोगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाच्या शहरटाकळी येथील माध्यमिक व उच्च माध्य

.

या शालेय निवडणुकीत एकूण ८६ उमेदवार आपले नशीब आजमावत होते. यामध्ये इयत्ता १२ वी (शाळा प्रतिनिधी) पदासाठी मुलांमधून २ तर मुलींमधून ६ उमेदवार रिंगणात होते. इयत्ता १० वी (शाळा प्रतिनिधी) पदासाठी मुलांमधून ६ तर मुलींमधून ४ उमेदवार, तर विविध वर्गांमधील वर्ग प्रतिनिधी पदासाठी एकूण ५० उमेदवार निवडणुकीच्या मैदानात होते. या उमेदवारांचे भवितव्य ठरवण्यासाठी इयत्ता ९ वी ते १२ वी मधील ४९९ आणि इयत्ता ५ वी ते ८ वी मधील ६५० अशा एकूण १,१४९ बाल मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

या निवडणूक प्रक्रियेचे उद्घाटन युवा उद्योजक आशिष लोखंडे, बबनराव नवले, प्राचार्या अंजली चिंतामण आणि पर्यवेक्षक पोपट खताळ यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कर्मयोगी आबासाहेब काकडे, स्व. निर्मलाताई काकडे आणि शिक्षणदेवता माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

उद्योजक लोखंडे म्हणाले, लोकशाही बळकट करण्यासाठी विद्यालयाने राबवलेला हा उपक्रम स्तुत्य आणि कौतुकास्पद आहे. शालेय जीवनातील या अनुभवामुळे भविष्यात देशाचे सुजाण नागरिक घडण्यास मोठी मदत होईल. शाळेतील या निवडणुकीत संपूर्ण पारदर्शकता राखण्यासाठी शिक्षकांनी निवडणूक अधिकारी म्हणून चोख जबाबदारी पार पाडली.

यामध्ये केंद्राध्यक्ष म्हणून गणेश लबडे, निवडणूक अधिकारी क्रमांक १ म्हणून ज्ञानेश्वर जाधव, तर निवडणूक अधिकारी क्रमांक २ म्हणून सचिन गाडे यांनी काम पाहिले. या प्रक्रियेला प्रवीण लद्दे यांचेही विशेष मार्गदर्शन लाभले. ही निवडणूक प्रक्रिया प्राचार्या अंजली चिंतामण, पर्यवेक्षक पोपट खताळ, सहशिक्षक ज्ञानेश्वर जाधव, प्रवीण लद्दे व अशोक भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *