![]()
स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवारी जिल्हा परिषद सदस्या संगीता संदीप आमराव यांच्या अध्यक्षतेखाली जनआरोग्य कल्याण समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि सर्व कर्मचाऱ्यांनी अनिवार्यपणे मुख्यालयी थांबूनच रुग्णांना चोवीस तास दर्जेदार सेवा द्यावी, अशा कडक सूचना या बैठकीत देण्यात आल्या. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर समितीच्या पदसिद्ध अध्यक्ष निवडीनंतर झालेली ही पहिलीच महत्त्वाची बैठक होती. या बैठकीत गाव पातळीवरील आरोग्य सेवा, औषधांची उपलब्धता, परिसर स्वच्छता आणि विविध राष्ट्रीय आरोग्य योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीनंतर समितीने प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषधसाठा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि प्रयोगशाळेच्या कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी करून त्रुटी दूर करण्याचे आदेश दिले. यावेळी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमोल जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रंगनाथ तुपे, वैद्यकीय अधिकारी डॉ. योगिता निर्मल, डॉ. शुभम कोनोरे, डॉ. यांच्यासह नागरिक उपस्थित होते. वाढत्या अपघातांमुळे ट्रामा केअर सेंटरची गरज लासूर स्टेशन आरोग्य केंद्रात आवश्यक मनुष्यबळ, वैद्यकीय उपकरणे आणि मूलभूत सुविधा अपुऱ्या आहे . विशेषतः लासूर स्टेशन परिसरात महामार्गावरील वाढलेल्या अपघातांच्या घटना पाहता, येथे ट्रॉमा केअर सेंटर तातडीने सुरू करण्यात यावे, अशी जोरदार मागणी उपस्थित नागरिकांनी केली. शासकीय योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचावा महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि इतर शासकीय आरोग्य योजनांचा लाभ परिसरातील जास्तीत जास्त गरजू आणि गरीब रुग्णांपर्यंत पोहोचवणे हे आपले मुख्य उद्दिष्ट आहे. यासाठी आरोग्य विभागाने गांभीर्याने काम करावे. -संगीता संदीप आमराव, अध्यक्ष, जनआरोग्य कल्याण समिती
Source link
लासूर स्टेशन येथील आरोग्य केंद्रात जनआरोग्य कल्याण समितीची बैठक:बैठकीत ट्राॅमा केअर सुरू करण्याची नागरिकांनी केली मागणी