![]()
तालुक्यात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेदरम्यान बी.एल.ओ. नागरिकांच्या घरोघरी न जाता गावातच ठराविक ठिकाणी ‘कॅम्प’ आयोजित करून अर्ज भरून घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट निर्देश दिलेले असतानाही प्रत्यक्ष नागरिकांच्या दारात न जाता कॅम्प लावून बसण्याच्या बी.एल.ओ. च्या या कार्यपद्धतीवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर कळवण तालुका शिवसेना { उर्वरित. पान ४ ^एसआयआर च्या कामासाठी असलेल्या बीएलओंनी घरोघरी जाऊन मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधून माहिती भरण्यासाठी आदेश दिलेले आहेत. या कामात कुणीही कसूर करत असेल तर कारवाई करणार. – काश्मीरा संखे, सहाय्यक जिल्हाधिकारी कळवण वयोवृद्ध, दिव्यांग, अशिक्षित, स्थलांतरित मजूर तसेच दुर्गम भागातील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अनेक नागरिक प्रक्रियेपासून वंचित राहत असल्याची भीती व्यक्त होत आहे. ^सर्व बी.एल.ओ.नी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करून स्वतः घरोघरी जाऊनच अर्ज भरून घेतले पाहिजेत. कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधितांवर तात्काळ कडक कारवाई करावी. – शरद पगार, तालुकाप्रमुख, शिवसेना, कळवण.
Source link
घरोघरी न जाता बीएलओंचा ‘कॅम्प' थाटून कारभार:कळवणमध्ये आदेशाला केराची टोपली, शिवसेनेने सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांना विचारला जाब