![]()
अहिल्यानगर–मनमाड महामार्गावरील सावळीविहीर जंक्शन येथे रस्ता व उड्डाणपुलाच्या कामामुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी पुढील तीन दिवसांत मोठ्या प्रमाणात कमी केली जाईल. यासाठी व्यापक कृती आराखडा तयार करण्यात आला असून, गुरुपौर्णिमेपूर्वी उड्डाणपुलाच्या शेवट
.
रस्त्याच्या मध्यरेषेपासून १५ मीटरच्या हद्दीतील सर्व अतिक्रमणे दोन दिवसांत स्वेच्छेने हटविण्याचे आवाहन डॉ. विखे यांनी केले आहे. मुदतीनंतर पोलीस प्रशासनाच्या मदतीने मंदिरे, टपऱ्या व इतर बांधकामे हटविण्याची कारवाई केली जाईल. तसेच, धुळीच्या समस्येबाबत बोलताना ते म्हणाले की, भरावावर सतत पाणी टाकल्यास डांबरीकरण करता येत नाही आणि रस्ता खचण्याचा धोका असतो. घाईघाईने काम करण्यापेक्षा दर्जेदार काम महत्त्वाचे असल्याने नागरिकांनी काही दिवस धुळीचा त्रास सहन करावा.
गेल्या १० वर्षांपासून नागरिक या रस्त्यामुळे त्रस्त आहेत. आता काम सुरू झाले असताना संयम राखणे गरजेचे आहे. ठेकेदाराशी संघर्ष करून काम रखडवणे योग्य नाही. चुका आढळल्यास त्या निश्चितपणे दुरुस्त केल्या जातील, असे डॉ. विखे म्हणाले. या बैठकीत अवजड वाहनांसाठी स्वतंत्र नियोजन करणे, कामाचा वेग वाढविणे आणि गुरुपौर्णिमेनंतर दुसऱ्या बाजूचे काम गतीने पूर्ण करणे यावर एकमत झाले. या सोयीमुळे शिर्डीत येणाऱ्या साईभक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दूध भेसळप्रकरणी निष्पक्ष कारवाईची अपेक्षा यावेळी जिल्ह्यात सुरू असलेल्या दूध भेसळविरोधी मोहिमेवरही डॉ. सुजय विखे यांनी भाष्य केले. भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, या भूमिकेचे त्यांनी समर्थन केले. मात्र, चुकीच्या कारवाईमुळे प्रामाणिक दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, असे सांगत या कारवायांना अचानक मिळणाऱ्या मोठ्या प्रसिद्धीबाबत त्यांनी सवाल उपस्थित केला. प्रशासनाने पारदर्शक व वस्तुनिष्ठ पद्धतीने काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.