Headlines

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर:फडणवीस यांच्यानंतर आता शिंदे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीला




‘ऑपरेशन टायगर’च्या यशस्वीतेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर गेले असून, या दौऱ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यात महत्त्वाची भेट झाली होती. त्यानंतर आता शिंदे दिल्लीत भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी कॅबिनेट मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा रंगलेली असतानाच हा दौरा होत असल्याने राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दिल्लीचा दौरा करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत महत्त्वाची बैठक घेतली होती. त्यामुळे हा दौरा आगामी मंत्रिमंडळ फेरबदलाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. या विस्तारात कामगिरी समाधानकारक नसलेल्या काही केंद्रीय मंत्र्यांना डच्चू दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात असून, त्याच वेळी शिंदे गटाला केंद्रीय मंत्रिमंडळात मोठी संधी मिळण्याचे संकेत आहेत. शिंदे गटाला केंद्रीय मंत्रिपदाची लॉटरी? केंद्रीय मंत्रिमंडळात शिंदे गटातील नेत्यांना महत्त्वाचे स्थान मिळू शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यामध्ये श्रीकांत शिंदे, उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंचे नेतृत्व स्वीकारणाऱ्या 6 बंडखोर खासदारांपैकी 2 खासदारांना केंद्रीय मंत्रिपदाची संधी दिली जाऊ शकते. मे महिन्यात सुद्धा एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौरा केला होता. हे ही वृत्त वाचा सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाला पक्षातूनच थेट आव्हान!:राष्ट्रवादीत अंतर्गत कलह उफाळला; प्रफुल्ल पटेल म्हणाले- त्या नोटीसला फार महत्त्व देण्याचे कारण नाही अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आली. मात्र, आता त्यांच्या या निवडीला थेट पक्षातूनच आव्हान देण्यात आले आहे. पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव आणि ज्येष्ठ नेते सच्चिदानंद सिंह यांनी वकिलांमार्फत नोटीस पाठवून सुनेत्रा पवारांच्या निवडीवर आक्षेप नोंदवला असून राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी केली आहे. या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रफुल्ल पटेल-सुनील तटकरे विरुद्ध सुनेत्रा पवार-पार्थ पवार असा अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. वाचा सविस्तर
अजित पवारांच्या निधनानंतर पक्षात नेतृत्वाची पोकळी:प्रफुल्ल पटेल म्हणाले- राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी सुधारणा गरजेच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाच्या भविष्यासंदर्भात महत्त्वपूर्ण विधान केले आहे. उपमुख्यमंत्री आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात मोठी नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली असून, राजकीयदृष्ट्या सक्षम राहण्यासाठी पक्षाने आवश्यक सुधारात्मक पावले उचलली पाहिजेत, असे पटेल यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *