![]()
सोनई कृषी महाविद्यालयाच्या कृषीकन्यांनी ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत बऱ्हाणपूर येथे शेतकऱ्यांसाठी विशेष चर्चासत्राचे आयोजन केले होते. प्रा. गणपत चव्हाण यांच्या वस्तीवरील प्रांगणात “कापूस पिकातील एकात्मिक कीड व र
.
या चर्चासत्रात कपाशीवरील कीड व रोगांमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी आणि पीक उत्पादन वाढीसाठी शास्त्रशुद्ध तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यात आला. कीटकशास्त्र विभागाचे प्रा. सोमनाथ दरंदले यांनी कपाशीमध्ये कीड येण्याची कारणे, त्यावरील विविध उपाय आणि शेतात वापरायचे वेगवेगळ्या प्रकारचे सापळे याविषयी मार्गदर्शन केले.
मृदा विज्ञान व कृषी रासायनिक विभागाचे सहाय्यक प्राध्यापक प्रा. जयसिंग वाघमारे यांनी माती परीक्षण अहवालानुसारच खतांचा वापर करण्याचे आवाहन केले. वनस्पती रोगशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक प्रा. सचिन खाटीक यांनी कापूस पिकातील एकात्मिक रोग व्यवस्थापन, त्यांची कारणे आणि शेतीत जैविक खतांचे असणारे अनन्यसाधारण महत्त्व पटवून दिले. उपप्राचार्य डॉ. सुनील बोरुडे म्हणाले, जमिनीचे आरोग्य सुधारणे ही काळाची गरज आहे. मातीतील सेंद्रिय कर्ब, संतुलित अन्नद्रव्ये, योग्य सामू, सूक्ष्मजीवांची सक्रियता, दर्जेदार सिंचनाचे पाणी आणि योग्य पीक व्यवस्थापन हे जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवणारे प्रमुख घटक आहेत. या कार्यक्रमासाठी कृषी प्राचार्य डॉ. हरी मोरे, प्रा. अनुप दरंदले, प्रा. दिशा चव्हाण, डॉ. संतोष चौगुले आणि प्रा. नरेंद्र दहातोंडे यांचे मार्गदर्शन लाभले.
सूत्रसंचालन व आभार पौर्णिमा काळभोर, प्रतीक्षा गोडसे, साक्षी भांबुरे, हिमांशी गवळी आणि आर्द्रा नायर या कृषीकन्यांनी केले. याप्रसंगी कृषी सहाय्यक सुवर्णा झिने, सरपंच शंकर चव्हाण, अशोक चव्हाण, ग्रामसेवक उदय मिसाळ, मच्छिंद्रनाथ चव्हाण गुरुजी, ॲड. बाळासाहेब चव्हाण, भाऊसाहेब चव्हाण यांच्यासह परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. शास्त्राधारित अशा चर्चासत्रांमुळे शेतीतील प्रत्यक्ष समस्यांवर मार्गदर्शन मिळत असल्याची भावना उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केली.