![]()
महाराष्ट्र शासनाच्या गाळमुक्त शिवार व गाळमुक्त धरण योजनेअंतर्गत पळसखेडे गाव तलावात सुरू असलेल्या गाळ काढणीच्या कामामुळे यंदा तलावात तब्बल ५ कोटी लिटर अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून जलसाठा वाढी
.
जलसंधारण विभागाचे मुख्य अभियंता हरिभाऊ गिते यांनी तलावाला भेट देऊन कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. कामाची गुणवत्ता आणि प्रगती समाधानकारक असल्याचे सांगत त्यांनी संबंधित यंत्रणेला काम वेळेत पूर्ण करण्याच्या तसेच अवनी ॲपवर गाळाची नोंदणी तातडीने करण्याच्या सूचना दिल्या. या उपक्रमांतर्गत तलावातून सुमारे ५० हजार घनमीटर गाळ काढण्यात येत असून त्यामुळे १२५ हेक्टर क्षेत्रातील जमीन अधिक सुपीक होण्यास मदत होणार आहे. तलावाची साठवण क्षमता वाढल्याने भूजल पातळी उंचावण्यासही मदत होणार असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी उपअभियंता विनायक पंडोरे, अभियंता भारत कोळी, संतोष आहेर, सरपंच संपत कांडेकर, संदीप कांडेकर, रामदास लहरे, साहेबराव कांडेकर, रोहिदास वाघ, ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब तडवी आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना मोफत गाळ, तलावातून काढण्यात येणारा गाळ पात्र शेतकऱ्यांना मोफत उपलब्ध करून दिला जात आहे. हा गाळ स्वखर्चाने वाहून न्यावा लागणार असला तरी शासनाच्या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ३५ हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. त्यामुळे या उपक्रमाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.