Headlines

भावली धरणावर छेडछाड, कुटुंबावर हल्ला:कारचा पाठलाग करत लूटमार, लाकडी दांडे, लाेखंडी राॅडने कारच्या काचा फोडल्या




भावली डॅम आणि रिसॉर्ट परिसरात वर्षा सहलीचा आनंद लुटण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेची धिंडवडे काढणारी अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. सोमवारी (दि. 12) सायंकाळी सहाच्या सुमारास नाशिकरोड येथील एका कुटुंबावर स्थानिक गुंडांनी लाकडी दांडे, लोखंडी रॉड आणि बेसबॉल स्टिकने जीवघेणा हल्ला केल्याची घटना मंगळवारी समोर आली आहे. याप्रकरणी अंबड पेालिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. महिलेची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना जाब विचारल्याचा राग आल्याने या गुंडांनी 7 किमी अंतरापर्यंत आणि घोटी टोलनाक्यासारख्या वर्दळीच्या ठिकाणी या कुटुंबाच्या कारचा पाठलाग करत कारच्या काचा फोडल्या. महिलेचा विनयभंग करत मोबाइल आणि सोन्याची साखळी लुटण्यात आली आहे. या कुटुंबाने थेट अंबड पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. नाशिकरोड येथील भागवत कुटुंबीय सोमवारी त्यांच्या (एमएच 15, केक्यू 1337) कारने भावली डॅमजवळील रिसॉर्ट परिसरात गेले होते. सायंकाळी धबधबा पाहत असताना दोन स्थानिक तरुणांनी महिलेकडे बघून शिट्टी वाजवली. महिलेच्या पतीने हटकले असता तिथे 8 गुंड जमा झाले आणि त्यांनी पतीला धक्काबुक्की केली. हे पाहून इतर नागरिकांनी भागवत कुटुंबाला तिथून जाण्यास सांगितले. पाठलाग करत हल्ला घटनास्थळावरून कुटुंब कारने पाच किमी पुढे आल्यानंतर गुंडांच्या कारने (एमएच 46, बीई 3721) पाठलाग करत भागवत यांची कार आडवत रॉडने कारच्या काचा फोडल्या. भागवत यांनी कार नाशिकच्या दिशेने नेली असता दोघांनी दुचाकीने (एमएच 15 के 4502))पाठलाग केला. टोलनाक्यावर हल्ला होईपर्यंत यंत्रणा सुस्तच धबधब्यापासून ते थेट घोटी टोलनाक्यापर्यंत एका कुटुंबाचा पाठलाग होतो. त्यांच्यावर सशस्त्र हल्ला होतो. महामार्गावर आणि टोलनाक्यावर सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षारक्षक आणि महामार्ग पोलिस असतात. तरीही कुणीही मदतीला आले नसल्याने संताप व्यक्त होत आहे. पावसाळ्यात हजारो पर्यटक भावली डॅम परिसरात येतात. स्थानिक गुंडांच्या टोळ्यांनी या परिसराला अड्डा बनवला आहे. पर्यमहिलांना टार्गेट करणे, दादागिरी करणे हे प्रकार नित्याचे आहेत. ग्रामीण पोलिसांनी या प्रवृत्तींना ठेचण्याची मागणी होत आहे. गुंडांच्या दुचाकी व कारचा नंबर समोर, अटकेचे आव्हान नाशिकरोड येथील भागवत कुटुंबीय सोमवारी त्यांच्या (एमएच 15, केक्यू 1337) कारने भावली डॅमजवळील रिसॉर्ट परिसरात गेले होते. सायंकाळी धबधबा पाहत असताना दोन स्थानिक तरुणांनी महिलेकडे बघून शिट्टी वाजवली. महिलेच्या पतीने हटकले असता तिथे 8 गुंड जमा झाले आणि त्यांनी पतीला धक्काबुक्की केली. हे पाहून इतर नागरिकांनी भागवत कुटुंबाला तिथून जाण्यास सांगितले. गुंडांच्या कारचा क्रमांक (एमएच 46 बीइ 3721) पोलिसांना मिळाला आहे. अंबड पोलिस संशयितांचा शोध घेत असून लवकरच त्यांच्या मुसक्या आवळणार असल्याचा दावा केला आहे. भागवत यांनी कार मागे घेत नाशिकच्या दिशेने नेली असता दुचाकीन आलेल्या दोघांनी पुन्हा कार अडवली आणि समोरील काच फोडली. यात महिलेच्या चेहऱ्याला आणि डोळ्याला गंभीर इजा झाली. पतीने प्रतिकार केला असता त्याच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडली. गुंडांनी घोटी टोलनाक्यापर्यंत पाठलाग केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *