मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवरून विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी सडकून टी
.
पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्री फडणवीस यांचे ठळक मुद्दे…
राहुल गांधींना प्रत्युत्तर: पेपरफुटी प्रकरणी राहुल गांधींनी केलेल्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, सरकारने पेपर फुटण्याआधीच प्रोॲक्टिव्ह कारवाई करून आंतरराज्य गुन्हेगारांना पकडले आहे. परीक्षा पारदर्शक व्हावी म्हणूनच ती पुढे ढकलण्यात आली. राहुल गांधी हे बहुतांश वेळ परदेशात असतात, त्यामुळे त्यांना इथली योग्य माहिती नसते, असा टोलाही त्यांनी लगावला.
शेतकरी कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय: रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वाखालील आमदारांच्या मागणीनुसार राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच जुन्या कर्जमाफी योजनेतील अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांनाही 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीत सामावून घेण्यात आले आहे. तसेच 2026-27च्या नियमित परतफेडीची अट रद्द करण्यात आली असून, 2025-26 ची परतफेड करणाऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम दिली जाणार आहे. देशातील सर्वात मोठ्या अशा या कर्जमाफीचा लाभ तब्बल 56 लाख शेतकऱ्यांना होणार आहे.
एसटी महामंडळाच्या जागांची विक्री नाही: एसटीच्या जागा विकल्या जात असल्याचा आरोप विरोधक आणि काही कामगार संघटना करत आहेत. यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, एसटीच्या एकाही जागेची विक्री होणार नसून जागेची मालकी कायम एसटी महामंडळाचीच राहील. केवळ दीर्घकालीन विकासासाठी या जागा भाडेतत्त्वावर दिल्या जातील. एसटीला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी आणि फायद्यात आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
2008च्या हल्ल्याबाबत धक्कादायक खुलासा: 2008चा मुंबई दहशतवादी हल्ला हा आयएसआय (ISI) आणि काँग्रेसचा कट होता, या माजी गृहसचिव आर. व्ही. एस. मणी यांच्या दाव्यावर मुख्यमंत्र्यांनी मोठी चिंता व्यक्त केली. हे वक्तव्य अत्यंत धक्कादायक असून या प्रकरणाची योग्य आणि सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
उद्धव ठाकरेंवर निशाणा: रामरक्षा आंदोलनावरून उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवताना मुख्यमंत्री म्हणाले की, रामरक्षेच्या नावावर राजकारण करणाऱ्या ठाकरेंना नीट रामरक्षा वाचताही येत नाही. उद्धव ठाकरे हे सध्या हताश आणि निराश झालेले असून, राजकारणात त्यांचे कोणतेही अस्तित्व उरलेले नाही, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
पेपरफुटी प्रकरणातील रद्द झालेल्या परीक्षेच्या नवीन तारखा राज्य सरकारकडून लवकरच घोषित केल्या जातील. शेतकरी कर्जमाफीच्या नव्या निकषांनुसार राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ देण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून वेगाने सुरू केली जाईल. तसेच, 2008 च्या दहशतवादी हल्ल्याबाबत माजी गृहसचिवांनी केलेल्या नव्या दाव्याच्या अनुषंगाने सरकारकडून चौकशीचे आदेश दिले जाण्याची दाट शक्यता आहे.
संबंधित बातमी वाचा…
शेतकऱ्यांना मोठा दिलासा ते ST बसस्थानकांचा कायापालट:फडणवीस सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय

राज्यातील शेतकरी, पायाभूत सुविधा आणि शहरी विकासाला मोठी गती देण्यासाठी राज्य सरकारने आज महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 14 जुलै रोजी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 8 अत्यंत महत्त्वाचे आणि राज्याचा चेहरामोहरा बदलणारे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी