![]()
तालुक्यातील गलवाडा येथे कर्ज फेडण्याच्या विवंचनेतून शामराव शेनफड जाधव (६०) या शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास उघडकीस आली. शामराव जाधव यांच्यावर राष्ट्रीयीकृत बँकांसह इतर खासगी संस्थांचे मिळून चार लाख रुपयांचे कर्ज होते. कर्ज कसे फेडायचे, या चिंतेत ते गेल्या काही दिवसांपासून होते. त्यातच गेल्या आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे खरीप पिके धोक्यात आली होती, ज्याची त्यांनी धास्ती घेतली होती. मंगळवारी रात्री सर्व कुटुंबीय गाढ झोपेत असताना, शामराव यांनी राहत्या घरातील पत्राच्या अँगलला गळफास घेतला. डॉ. खंदारे यांनी शवविच्छेदन केल्यानंतर दुपारी दोन वाजता मृतावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे. चिंतेतून उचलले पाऊल शामराव जाधव यांची गलवाडा शिवारात शेती आहे. यंदा त्यांनी मोठ्या आशेने मक्याची लागवड केली होती. मात्र, ऐन वाढीच्या काळात पावसाने ओढ दिल्याने मक्याचे पीक करपू लागले होते. डोळ्यांदेखत पीक जळत असल्याने आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर असल्याने वाढलेल्या मानसिक तणावातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. पावसाअभावी मका करपला
Source link
कर्जाच्या विवंचनेत शेतकऱ्याची घरात गळफास घेऊन आत्महत्या:सोयगाव तालुक्यातील गलवाडा येथे राहत्या घरातील घटना