![]()
सोलापूर आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी थेट संबंध असणाऱ्या आणि शासनाची फसवणूक करून तब्बल १०.५० कोटी रुपयांचा अपहार करणाऱ्या सोलापुरातील एका संस्थेच्या तीन पदाधिकाऱ्यांचे जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावले आहेत. मुंबई दहशतवाद विरोधी पथकाने या प्रकरणाचा पर्दाफाश केला असून, आरोपींचे पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनांशी थेट संपर्क असल्याचे तपासात उघड झाले आहे. मुंबईच्या एटीएसने एका संस्थेच्या पदाधिऱ्यांना अटक करून सोमवारी जिल्हा न्यायालयात उभे केले होते. दस्त नोंदणी आणि धर्मादाय नोंदणी प्रक्रियेतील तांत्रिक बाबींचा गैरफायदा घेऊन या आरोपींनी तब्बल १० कोटी ५० लाख रुपयांचा अपहार केल्याची फिर्याद एटीएसने दिली होती. संगनमत करून देणगीदार, आयकर विभाग, धर्मादाय कार्यालय, बँका तसेच शासनाची दिशाभूल करत ही आर्थिक फसवणूक केल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय पातळीवर जोडले गेले आहेत. एका आंतरराष्ट्रीय संस्थेने सोलापुरात ही एनजीओ सुरू करण्यासाठी सुरुवातीला आरोपींना ८ लाख रुपये दिले होते. नंतरच्या काळात विविध छोट्या संस्थांच्या माध्यमातून तब्बल १२६ कोटी ७ लाख ४१ हजार ४५७ रुपयांचा निधी गोळा केल्याची माहिती आता समोर आली. ७२ पदाधिकाऱ्यांचे नंबर तपास यंत्रणांनी या एनजीओच्या पदाधिकाऱ्यांचे मोबाईल जप्त केले. त्यांच्या मोबाईलमधील व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ५० पेक्षा अधिक पाकिस्तानी नागरिकांचे नंबर आढळून आले आहेत. तसेच, संबंधित आंतरराष्ट्रीय संघटनेच्या ७२ हून अधिक पदाधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांकही तपासात निष्पन्न झाले आहेत. या गंभीर पुराव्यांमुळे प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. आंतरराष्ट्रीय संघटनेच्या देशविघातक कृत्यांसाठी आरोपींनी अपहार केला या कारवाईतून वाचण्यासाठी एका संशयित आरोपीने नियमित तर अन्य दोघांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. त्याला सरकारी वकील ॲड. प्रदीपसिंग राजपूत यांनी कडाडून विरोध केला. आरोपींचा पाकिस्तानी नागरिकांशी व आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी थेट संपर्क असल्याने त्यांना कोणत्याही परिस्थितीत जामीन मंजूर करू नये.’ हा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावले. धक्कादायक . देशविघातक कृत्यांसाठी १० कोटींचा अपहार; जिल्हा न्यायालयाने जामीन फेटाळले, आयकर, चॅरिटी, बॅंकांची दिशाभूल केल्याचा ठपका पीएफआय’ राबवले होते. यावेळी मध्यरात्री महाराष्ट्रात ५० हून अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आले, ज्यामध्ये सोलापूरचाही समावेश होता. सोलापूरमधून पीएफआयच्या संशयित कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन दिल्लीला चौकशीसाठी नेण्यात आले होते. २०२५ : पुणे एटीएसने अल-कायदा या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून मूळच्या सोलापूरच्या असलेल्या जुबेर हंगरगेकर या आयटी इंजिनिअरला अटक केली होती. त्याच्याकडे बॉम्ब आणि मशीन गन बनवण्याची माहिती असलेली कागदपत्रे सापडली होती. कुंभारी परिसरात एका शाळेत त्याने काही तरुणांसाठी कार्यक्रम घेतला होता. २०२२ : ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) या संघटनेवर दहशतवाद्यांना अर्थपुरवठा केल्याचा आणि देशविरोधी कारवायांचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला. सप्टेंबर २०२२ मध्ये संपूर्ण देशभरात ‘ऑपरेशन
Source link
धक्कादायक:सोलापुरातील ‘त्या’आरोपींच्या व्हॉट्सॲपग्रुपमध्ये 50 पाकिस्तानी नंबर, देशविघातक कृत्यांसाठी 10 कोटींचा अपहार