Headlines

एसआयआर:सेनगावात मतदारांनी भरलेले अर्ज तातडीने बुथ लेवल अधिकाऱ्यांकडे जमा करा- मुख्याधिकारी




सेनगाव शहरात मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम युद्ध पातळीवर राबविला जात असून मतदारांनी त्यांनी भरलेले अर्ज तातडीने बुथ लेव्हल अधिकाऱ्यांकडे जमा करण्याचे आवाहन पालिकेचे मुख्याधिकारी गणेश गांजरे यांनी केली आहे. सेनगाव शहरा मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम दिनांक 30 जून पासून सुरू आहे. त्यासाठी प्रत्येक प्रभागा साठी बुथ लेव्हल अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये मतदारांकडून गणना फॉर्म भरून घेण्यात येत आहेत. मतदार यादीत अचूकता आणण्यासाठी हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाचा मुख्य भर कोणताही पात्र मतदार वंचित राहणार नाही, कोणतीही अपात्र व्यक्ती समाविष्ट होणार नाही यावर आहे. हिंगोली जिल्ह्यात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम राबविला जात आहे. यासाठी निवडणूक उपजिल्हाधिकारी चोंडेकर, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, तहसीलदार सखाराम मांडवगडे यांच्या पथकाकडून वेळोवेळी भेटी देऊन पाहणी केली जात आहे. या कार्यक्रम अंतर्गत सेनगाव नगरपंचायत अध्यक्षा यमुनाबाई देशमुख यांनी आपला गणना फॉर्म सहायक मतदान नोंदणी अधिकारी तथा मुख्याधिकारी गणेश गांजरे व तिडके ,मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे सुपूर्द केला . तसेच त्यांनी सर्व नागरिकांना लवकरात लवकर आपले गणना फॉर्म भरून जमा करून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी . शेख , पर्यवेक्षक दिनकर जगन्नाथ, पडोळे, बोकारे आदी पालिका कर्मचारी उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमांतर्गत संदेश देशमुख,नगरपंचायत उपाध्यक्ष शिलानंद वाकळे, गटनेते अमोल तिडके , नगरसेवक निखिल देशमुख, वैभव देशमुख, सतीश खाडे, राजकुमार देशमुख, उमेश देशमुख, श्री. बाळू उफाड , गिरधारी तोष्णिवाल आणि इतर नागरिकांनी आपले फॉर्म जमा केले. सर्व नागरिकांनी शक्य तितक्या लवकर योग्य भरलेले गणना फॉर्म बिएलओ यांच्याकडे जमा करावेत आणि आपला मतदानाचा अधिकार अबाधित ठेवावा. तसेच बिएलओ व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन मुख्य अधिकारी गांजरे यांनी केली आहे



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *