Headlines

समाजाच्या प्रगतीसाठी धर्म, संस्कार समाजसेवेचे व्रत अंगिकारावे:उपाध्याय प्रवर प्रवीण ऋषीजी महाराज यांचे युवकांना आवाहन, महाप्रसादाने सोहळ्याची सांगता‎



नवी पेठ जैन धर्मस्थानकाला मोठा गौरवशाली इतिहास आणि धार्मिक परंपरा लाभली आहे. हे स्थान केवळ एक वास्तू नसून शहराच्या आध्यात्मिक ऊर्जेचे केंद्र आहे. येथील ज्येष्ठ समाजबांधवांनी श्रद्धेची आणि एकोप्याची जी परंपरा जोपासली आहे, तीच खरी संपत्ती आहे. आजच्या ब

.

याप्रसंगी आयोजित धर्मसभेत पूज्य उपाध्याय प्रवर श्री प्रवीण ऋषीजी महाराज यांनी आपल्या प्रभावी वाणीतून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी नवी पेठ जैन धर्मस्थानकाचा गौरवशाली इतिहास, येथील समृद्ध धार्मिक परंपरा आणि या पवित्र स्थानाचे आध्यात्मिक महत्त्व याविषयी सखोल मार्गदर्शन केले. चातुर्मास समितीचे प्रमुख अशोक बोरा यांनी आपल्या मनोगतातून धर्मस्थानकाच्या स्थापनेपासूनच्या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी आठवणींना उजाळा दिला. नेहा ओसवाल आणि पद्मा गांधी यांनी सुरांमध्ये भक्तिमय स्तवन सादर करून वातावरण अधिक मंगलमय केले. तर आनंद पाठशाळेतील विद्यार्थिनींनी सादर केलेल्या लेझीम नृत्याने उपस्थितांची मने जिंकली.

या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी जय आनंद युवक मंडळ, आनंद चालीसा ग्रुप तसेच नवी पेठ परिसरातील युवक-युवतींनी विशेष परिश्रम घेतले. जय आनंद महावीर युवक मंडळाचे अध्यक्ष शैलेश मुनोत यांनी सांगितले की, महाराजांच्या आगमनामुळे संपूर्ण पेठेत उत्साहाचे वातावरण आहे. या प्रसंगी चातुर्मास समितीचे अशोक बोरा, मंडळाचे अध्यक्ष शैलेश मुनोत, वसंत लोढा, पारस लोढा, सुभाष भंडारी, ईश्वर बोरा, आनंद मुथा, सत्यन मुथा, सचिन डागा आदींनी महाराजांचे पाद्यपूजन व स्वागत केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *