मुंबई-गोवा महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात झाला. गोव्यावरून मुंबईकडे परतणाऱ्या एका कुटुंबाच्या भरधाव कारने लांजाजवळ पुढे जाणाऱ्या डंपरला मागून जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत कारचा अक्षरशः चुराडा झाला असून एकाच कुटुंबातील दोन महिला आणि एका चिमुकल
.
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित कुटुंब गोव्यातील प्रवास आटोपून मुंबईच्या दिशेने निघाले होते. लांजा शहराजवळ आल्यानंतर त्यांच्या कारची पुढे जात असलेल्या डंपरला मागून जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की कारच्या पुढील भागाचा पूर्ण चुराडा झाला आणि वाहनातील तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहनात अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिस आणि आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल झाली. मृतांची ओळख अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नसून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला. अपघातग्रस्त वाहन हटवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना केल्या.
कशेडी घाटात दरड कोसळली; वाहतूक वळवली
दरम्यान, मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात धामणदिवी गावाजवळील कशेडी घाटात दरड कोसळल्याची घटना घडली. दरडीमुळे कोकणातून मुंबईकडे जाणारी लेन माती आणि दगडांनी बंद झाली.
घटनेनंतर पोलिस, महसूल विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांनी घटनास्थळी धाव घेत जेसीबीच्या सहाय्याने दरड हटवण्याचे काम सुरू केले. दरम्यान, मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या लेनवरून दोन्ही बाजूंची वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे.
प्रशासनाने वाहनचालकांना पावसाच्या पार्श्वभूमीवर सावधगिरीने वाहन चालवण्याचे आवाहन केले असून महामार्गावरील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असल्याची माहिती दिली आहे.
हेही वाचा…
नाशिकच्या सावळा घाटात भीषण अपघात:ब्रेक फेल झाल्याने भरधाव ट्रकची कारला धडक, 4 जणांचा मृत्यू; एक जखमी

नाशिकच्या सावळा घाटात मंगळवारी सायंकाळी अत्यंत भीषण अपघात घडला. एका भरधाव ट्रकचे ब्रेक अचानक फेल झाल्याने तो थेट पुढच्या इको कारवर जाऊन आदळला. या जोरदार धडकेमुळे ती कार आणखी एका पुढच्या ट्रकमध्ये घुसली आणि दोन मोठ्या वाहनांच्या मध्ये या कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या दुर्दैवी घटनेत कारमधील चार जणांचा मृत्यू झाला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी