![]()
संभाजीनगर -पुणे महामार्गावरील दहेगाव बंगला परिसरात मंगळवारी सायंकाळी ४.३० वाजेच्या भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील दोन जण जागीच ठार झाले. राजू उत्तम नामेकर (४५) आणि बाबासाहेब शिंदे (५२ , दोघेही रा. दहेगाव) अशी मृतांची नावे आहेत. १४ जुलै रोजी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास राजू उत्तम नामेकर आणि बाबासाहेब शिंदे हे दोघे आपल्या कामानिमित्त दुचाकीवरून (एमएच २० एचएफ ५१२९) छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जात होते. याच वेळी सं भाजीनगरहून पुण्याच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या ट्रकने (डब्ल्यूबी ११ ई ०२०३) त्यांच्या दुचाकीला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, दोघेही गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन घाटी रुग्णालयात करण्यात आले असून, आज, बुधवारी सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. मृत राजू नामेकर हे एका खाजगी कंपनीत पेंटर म्हणून काम करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि आई-वडील असा परिवार आहे. तर द बाबासाहेब शिंदे हे ग्रामपंचायतीचे कर्मचारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. दोन्ही पुरुष कुटुंबातील कर्ते होते. घटनास्थळावरून पळून जाणाऱ्या ट्रकचालकाचा गणेश राऊत, पप्पू खरात, साजन खरात आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दहेगाव बंगला ते भेंडाळा फाट्यापर्यंत ८ किमी पाठलाग करीत चालकास पकडले. पकडले. त्याला तातडीने वाळूज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दोन कर्ते पुरुष गमावले
Source link
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार:दहेगाव बंगला येथील घटना, ट्रकचालक ताब्यात