Headlines

जायकवाडी धरणामध्ये गतवर्षी 75 तर यंदा केवळ 31.49% जलसाठा:गतवर्षी याच काळात पाच वेळा गोदापात्रात पाणी सोडले‎



जुलैचा मध्य उलटून गेला तरी जायकवाडी धरणात अद्याप लक्षणीय पाण्याची आवक झालेली नाही. गतवर्षी याच काळात धरणात प्रतिसेकंद ५२ हजार क्युसेकपेक्षा अधिक वेगाने पाणी येत होते. गेल्या वर्षी १५ जुलैपर्यंत धरणाचा साठा ७५ टक्क्यांच्या पुढे गेल्याने धरणातून दोन मह

.

धरणात सध्या ६८३.५३९ दलघमी म्हणजेच केवळ ३१.४९ टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. धरणाची सध्याची पाणीपातळी १५०६.३७ फूट (४५९.१४२ मीटर) इतकी असून सद्य:स्थितीत नवीन आवक आणि विसर्ग दोन्ही शून्य आहेत. विशेष म्हणजे, १ जून २०२६ पासून धरणात आजवर केवळ ९६.१७३ दलघमी (३.३९५९ टीएमसी) म्हणजेच अवघी ३ टक्के नवीन पाण्याची आवक झाली असल्याचे जलसंपदा विभागाचे शाखा अभियंता मंगेश शेलार यांनी सांगितले. धरण पूर्ण भरलेली वर्षे यापूर्वी १९८३ (९३.८७%), १९८८ (९४.४%), १९९० (९१.०४%), १९९१ (१००%), १९९५ (८८.१६%), १९९९ (९७.९३%), २००० (९९.८३%), २००५, २००६, २००७, २००८, २००९ आणि २०१९, २०२२ ते २०२४ सलग ३ वर्षांत धरण १०० टक्क्यांवर होते. धरणात सध्या ६८३.५३९ दलघमी म्हणजेच केवळ ३१.४९ टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. १ जून २०२६ पासून धरणात आजवर केवळ ९६.१७३ दलघमी (३.३९५९ टीएमसी) म्हणजेच अवघी ३ टक्के नवीन पाण्याची आवक झाली आहे. जायकवाडी धरणाला डावा आणि उजवा असे दोन मुख्य कालवे आहेत. २०८ किलोमीटर लांबीच्या डाव्या कालव्याची वहन क्षमता १०० घनमीटर प्रतिसेकंद आहे. १ लाख ४१ हजार ६४० हेक्टर शेती ओलिताखाली येते. तर १३२ किलोमीटरच्या उजव्या कालव्याची वहन क्षमता ६३.७१ घनमीटर प्रतिसेकंद आहे. जायकवाडी धरण अद्याप रिकामेच असल्याने भविष्यात पैठण, संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याला पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने धरणातील पाणी सध्या तरी पिण्यासाठी राखीव ठेवावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जितुभाऊ परदेशी यांनी केली आहे.

या वर्षांत धरण १०० %

असा होतो डाव्या अन् उजव्या कालव्यांद्वारे पाणीपुरवठा

धरणामधील पाणी केवळ पिण्यासाठीच राखीव ठेवावे



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *