![]()
शहरातील विविध निवासी भागांमधून आणि अनेक घरांच्या छतांवरुन गेलेल्या ११ केव्ही उच्चदाब वीज वाहिन्यांमुळे नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार गजानन लवटे यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्
.
शहरातील अनेक घरांवरुन जाणाऱ्या उच्चदाब वीज वाहिन्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पावसाळ्यात शॉर्टसर्किट, स्पार्किंग किंवा इतर तांत्रिक बिघाड होऊन मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. या समस्येची गांभीर्याने दखल घेत आमदार लवटे यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता दीपक देवहाते आणि कार्यकारी अभियंता प्रशांत चौधरी यांच्यासह प्रत्यक्ष स्थळांची पाहणी केली. पाहणीदरम्यान नागरिकांची सुरक्षितता धोक्यात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आमदार लवटे यांनी अधिकाऱ्यांना सूचना देत, “ज्या-ज्या घरांवरून ११ केव्ही वीजवाहिन्या जात आहेत, त्या सर्व वाहिन्या तातडीने हटवून सुरक्षित पर्यायी मार्गाने स्थलांतरित करण्यात याव्यात. कोणत्याही दुर्घटनेची वाट न पाहता नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या,’ असे निर्देश दिले.
आमदारांच्या या भूमिकेनंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करुन काम लवकरात लवकर हाती घेण्याचे आश्वासन दिले. यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता दीपक देवहाते यांच्यासह उपकार्यकारी अभियंता तुषार गांजरे, सहाय्यक अभियंता तुषार चव्हाण, शिवसेना तालुकाप्रमुख कपिल देशमुख, शहरप्रमुख राजू अकोटकर, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते प्रेम बोके, अंजनगाव सुर्जी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विकास येवले, नगरसेवक सुयोग खाडे, सोनू जुनघरे, गजानन विजेकर, सुधीर देवगिरे, अविनाश ढेंगे, आशिक अन्सारी, रेहानभाई, राजू भांबुरकर, उद्धव गीते, संबंधित विभागाचे अधिकारी, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते. अंजनगाव सुर्जीप्रमाणेच दर्यापूर शहरातही वीज वाहिन्यांची हीच स्थिती आहे. अनेक घरांवरुन किंवा घराच्या छतांच्या अगदी जवळून वीज वाहून नेली जाते. त्यामुळे घरातील व्यक्तींसोबत केव्हाही धोका होऊ शकतो. पावसाळ्याच्या दिवसांत वीजेचे खांब वाकणे, तारा तुटणे आदी घटनादेखील होत असतात. अशावेळी संभाव्य धोका टाळण्यासाठी वेळीच पावले उचलली जाणे आवश्यक आहे. त्यासाठीचे निर्देशही महावितरणच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
अंजनगाव सुर्जीप्रमाणेच दर्यापूर शहरातही वीज वाहिन्यांची हीच स्थिती कायम