Headlines

तोंडले- बोंडले येथील अपघातात पतीचा जागीच मृत्यू तर पत्नी गंभीर:नंदाच्या ओढ्यावरील पुलावर दुभाजक ओलांडणे बेतले जीवावर‎



तोंडले- बोंडले (ता. माळशिरस) पुणे– पंढरपूर पालखी मार्गावरील तोंडले- बोंडले येथील नंदाच्या ओढ्यावरील पुलावर रस्ता दुभाजक ओलांडण्याचा प्रयत्न एका दुचाकीस्वाराच्या जीवावर बेतला. मागून भरधाव येणाऱ्या ट्रकच्या धडकेत दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर मा

.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात आज सायंकाळी सुमारे ५ वाजेच्या सुमारास घडला. दुचाकीवरून प्रवास करणारे दोघेजण डिव्हायडर ओलांडून रस्ता पार करण्याचा प्रयत्न करीत असताना मोटारसायकल पुढे निघू शकली नाही. त्याचवेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने (क्र. एमएच-४३ वाय-६९७९) दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकी चालक शहाजी नामदेव पाटील (वय ५५, रा. करोळे) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर सहप्रवासी मायाबाई शहाजी पाटील (वय ४५, रा. करोळे) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चालक जागीच ठार, महिला गंभीर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *