![]()
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून मंगळवारी राज्यभरातील आगारांमध्ये वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली.
.
या उपक्रमाचा भाग म्हणून पारनेर आगाराच्या वतीने बसस्थानक परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
पारनेर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा डॉ. विद्या कावरे यांच्या हस्ते व आगार व्यवस्थापक प्रशांत काळे यांच्या उपस्थितीत आगार व बसस्थानक परिसरात विविध प्रकारच्या रोपांची लागवड करण्यात आली.
आगार व्यवस्थापक काळे म्हणाले की, केवळ वृक्षारोपण केले म्हणजे आपली जबाबदारी संपली.असे होऊ नये तर लावलेल्या रोपांच्या नियमित संगोपन, संवर्धनाची जबाबदारीही आगारातील प्रत्येक घटकाची आहे. हा उपक्रम केवळ एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता,भविष्यातही पर्यावरण संवर्धनासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू राहणार असल्याची ग्वाही काळे यांनी दिली.
यावेळी वाहतूक निरीक्षक जगदीश कारखिले,वरिष्ठ सहायक सागर लोंढे,लिपिक सुरेश औटी, , लेखाकार श्रीमती बद्दर,श्रीमती बसापुरे,वाहतूक निरीक्षक गिरीश वाखारे,वाहतूक नियंत्रक जितेंद्र शेळके यांच्यासह पारनेर आगारातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्व कर्मचाऱ्यांनी वृक्षारोपणात सक्रिय सहभाग नोंदवला.
एसटी महामंडळ प्रवाशांच्या सेवेसोबतच आता सामाजिक बांधीलकीही तितक्याच जबाबदारीने पार पाडत असल्याचे या उपक्रमातून दिसून आले. वृक्षारोपणामुळे पारनेर बसस्थानकाचा परिसर येणाऱ्या काळात अधिक हिरवागार आणि निसर्गरम्य दिसणार आहे, ज्यामुळे प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.
^ एसटी महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त राबविण्यात येणारा हा राज्यव्यापी वृक्षारोपण उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. यामुळे केवळ पर्यावरणाचे संवर्धन होणार नाही,तर अधिकारी,कर्मचाऱ्यांम ध्ये सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव अधिक दृढ होईल.वृक्षारोपण ही काळाची गरज असून,प्रत्येकाने एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करणे आवश्यक आहे. -डॉ.विद्या कावरे, नगराध्यक्षा,पारनेर नगरपंचायत.